Ganapati Special Trains: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वे सोडणार 'स्पेशल गाड्या', येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ganpati Konkan Special Trains: चाकरमान्यांना प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.
Ganapati Special Trains
Ganapati Special TrainsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गणेशचतुर्थीनिमित्त आपआपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवाशांच्या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.

गाड्यांची यादी व वेळापत्रक पुढीलप्रमाणे

१) ट्रेन क्रमांक ०११५५ व ०११५६ दिवा जंक्शन ते चिपळूण व परत. ट्रेन क्रमांक ०११५५ ही गाडी २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दिवा जंक्शनवरून ०७.१५ वा. सुटेल व चिपळूण स्थानकावर १४.०० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५६ चिपळूण येथून १५.३० वा. सुटेल व दिवा जंक्शनवर त्याच दिवशी २२.५० वा. पोहोचेल.

२) ट्रेन क्रमांक ०११६५ व ०११६६ लोकमान्य टिळक ते मडगाव व परत. या ट्रेन साप्ताहिक असून ०११६५ क्रमांकाची ट्रेन लोकमान्य टिळक स्थानकाहून २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर या दिवसांत ००.४५ वा. सुटेल व मडगाव स्थानकावर त्याच दिवशी १४.३० वा. पोहोचेल. ०११६६ क्रमांकाची ट्रेन मडगाव स्थानकाहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर या दिवशी १६.३० वा. सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०४.५० वा. पोहोचेल. ही ट्रेन गोव्यात थिवी व करमळी या स्थानकावर थांबेल.

Ganapati Special Trains
Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

३) ट्रेन क्रमांक ०११८५ व ०११८६ लोकमान्य टिळक ते मडगाव व परत (साप्ताहिक). ट्रेन क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक स्थानकावरून २७ ऑगस्ट व ३ सप्टेंबर या दिवशी ००.४५ वा. सुटेल व मडगाव स्थानकावर त्याच दिवशी १४.३० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११८६ मडगावहून २७ ऑगस्ट व ३ सप्टेंबर असे दोन दिवस १६.३० वा. सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०४.५० वा. पोहोचेल. गोव्यात ही ट्रेन करमळी व थिवी स्थानकावर थांबेल.

४) ट्रेन क्रमांक ०११२९ व ०११३० लोकमान्य टिळक ते सावंतवाडी रोड (साप्ताहिक). ०११२९ क्रमांकाची ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस ०८.४५ वा. सुटेल व सावंतवाडी रोड स्थानकावर त्याच दिवशी २२.२० वा. पोहोचेल. ०११३० क्रमांकाची ट्रेन सावंतवाडी रोड स्थानकावरून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस २३.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनसवर दुसऱ्या दिवशी ११.४५ वा. पोहोचेल.

Ganapati Special Trains
Goa Crime: घात की अपघात? वास्को रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

५) ट्रेन क्रमांक ०१४४५ व ०१४४६ पुणे जंक्शन ते रत्नागिरी व परत (साप्ताहिक). ट्रेन क्रमांक ०१४४५ पुणे जंक्शनहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस ००.२५ वा. सुटेल व रत्नागिरीला त्याच दिवशी ११.५० वा. पोहोचेल. ०१४४६ क्रमांकाची ट्रेन रत्नागिरीहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस १७.५० वा. सुटेल व पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ५.०० वा. पोहोचेल.

६) ट्रेन क्रमांक ०१४४७ व ०१४४८ पुणे जंक्शन ते रत्नागिरी (साप्ताहिक). ट्रेन क्रमांक ०१४४७ शनिवार २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर असे तीन दिवस पुणे जंक्शनवरून ००.२५ वा. सुटेल व रत्नागिरीला त्याचदिवशी ११.५० वा. पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१४४८ क्रमांकाची ट्रेन शनिवार २३ व ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर असे तीन दिवस रत्नागिरीहून १७.५० वा. सुटेल व पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ५.०० वा. पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com