Goa-Portugal Tourism: गोवा-पोर्तुगालसाठी हवे विशेष पर्यटन पॅकेज; 12 विद्यार्थ्यांची गोव्याला भेट

गोव्यातील लोकसंस्कृती, परंपरा घेतली जाणून
Goa-Portugal Tourism hospitality Students
Goa-Portugal Tourism hospitality StudentsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Portugal Special Tourism Package: गोवा आणि पोर्तुगालमध्ये विशेष पर्यटन पॅकेज असले पाहिजे. त्याद्वारे दोन प्रदेशांतील नागरिकांमधील बंध आणखी मजबूत करता येऊ शकतात, असे प्रतिपादन टुरिस्मो डी पोर्तुगाल या संस्थेच्या प्रशिक्षण आणि शिक्षण प्रमुख यांनी अॅना पॉला पेस केले. पेस या पोर्तुगालमधील फेडरल टूरिझम अथॉरिटीचे प्रतिनिधित्व करतात.

Goa-Portugal Tourism hospitality Students
Chorla Car Accident: चोर्ला घाटात दरीत कोसळली कार; गाडीतील तिघांना वाचविण्यासाठी मध्यरात्री राबवली मोहिम...

पोर्तुगालच्या 12 हॉस्पिटॅलिटी संस्थांमधील 12 विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच गोव्यात आले होते. मुरगाव तालुक्यात राय येथील व्ही. एम. साळगावकर इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटिलिटी एज्युकेशन (VMSIIHE) संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे विद्यार्थी सहभागी झाले.

साळगावकर इन्स्टिट्युटचे टुरिस्मो डी पोर्तुगाल संस्थेसोबत सहकार्य आहे. 'आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि शिक्षण कार्यक्रमा'चा एक भाग म्हणून पोर्तुगालचे हे विद्यार्थी गोव्यात आले असून ते गोव्यातील हॉस्पिटॅलिटी, पाककृती आणि संस्कृतीची माहिती घेत आहेत.

Goa-Portugal Tourism hospitality Students
Accident in Goa : वरूणापुरी जंक्शन येथे कर्नाटकच्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; डीफेन्स कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

पेस म्हणाल्या की, पोर्तुगीज विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे शिष्टमंडळ यांची ही एकूण चार आठवड्यांची भेट होती. या महिन्याभराच्या काळात या सर्वांनी विचारांची देवाणघेवाण केली. गोव्यातील लोकांची संस्कृती आणि परंपरा जाणून घेतल्या. विशेष पर्यटन पॅकेजद्वारे दोन्ही प्रदेशातील ऐतिहासिक संबंध आणखी सुधारता येतील.

त्यासाठी विशिष्ट पॅकेज तयार करू शकतो. लिस्बनमधील आमच्या राष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात भारतीय पर्यटन मंत्री अलीकडेच सहभागी झाले होते. त्यांनीही दोन्ही देशांमधील सहकार्य मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान, VMSIIHE चे विद्यार्थीदेखील या एक्सचेंज प्रोग्रामच्या दुसऱ्या टप्प्यात पोर्तुगालमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com