गोवेकरांच्या शिक्षणासाठी सरकारकडून 3850.98 कोटींची खास तरतूद

आपत्कालीन सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय बांधण्यात येणार
Special provision of Rs. 3850.98 crore from BJP government in the budget for Govekar's education
Special provision of Rs. 3850.98 crore from BJP government in the budget for Govekar's educationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा मंत्रिमडळाच्या सोमवारी झालेल्या शपथविधीनंतर आज बुधवारी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. रोजगार संधी, पर्यटन आणि साधन सुविधांची निर्मिती करणारा, खनिज उद्योग आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प 24,467.40 कोटींचा आहे.

दरम्यान, यावेळीच्या अर्थसंकल्पात (Budget) गोवेकरांच्या शिक्षणासाठी सरकारकडून 3850.98 कोटींची खास तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्व शाळांमध्ये विज्ञान (Science) प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना विज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान देखील भेटणार आहे. कोडिंग आणि रोबोटिक्स पकल्पासाठी 21.86 कोटींची तरतूद प्रमोद सावंत सरकारने (Government) केली आहे. तसेच शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार असून शिक्षकांसाठी देखील सामायिक परीक्षा सक्तीची करण्यात येणार आहे. तसेच 350 शाळांमध्ये सायन्स लॅबची स्थापना करण्यात येणार आहे.

Special provision of Rs. 3850.98 crore from BJP government in the budget for Govekar's education
अर्थसंकल्प सादर, राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा

दरम्यान, गोव्यात (goa) प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचं आपत्कालीन सेवा पुरवणारे रुग्णालय (Hospital) बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्तर गोव्यात ईएसआय रुग्णालय उभारले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. वाहतुकीचा (Transportation) प्रश्न लक्षात घेत राज्यात आणखी 115 इलेक्ट्रिक बसेस सावंत सरकार घेणार आहे. यामुळे शाळकरी मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो तसेच राज्यातील कामगार वर्गाला देखील या बसेसचा लाभ होईल. याच पार्श्वभूमीवर पणजी, (panaji) मडगावात पीपीपी तत्त्वावर बसस्थानके उभारली जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com