‘ओडीपी’साठी सल्लागार पॅनल नेमलं जाणार

ओडीपीसंबंधीची घोषणा नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी या अगोदरच केली आहे.
Vishwajit Rane on ODP
Vishwajit Rane on ODPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : नगर नियोजन खात्याने निलंबित केलेल्या बाह्यविकास आराखडे (ओडीपी) आणि प्रादेशिक विकास आराखडा बनवण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीची (जीआयएस) अद्ययावत माहिती असणाऱ्या सल्लागारांची नेमणूक करणार असल्याची माहिती नगर नियोजन खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, या ओडीपीसंबंधीची घोषणा नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी या अगोदरच केली आहे.

नगर नियोजन खात्याअंतर्गत येणारे सूचित 3 बाह्यविकास आराखडे आणि मसुदा स्वरूपात स्वरूपात असलेले 8 आराखडे 27 एप्रिलपासून खात्याने निलंबित केले आहेत. यापूर्वी स्थानिक नागरिकांनी या आराखड्यांना आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेऊन सरकारने हे आराखडे निलंबित केले आहेत. याशिवाय प्रादेशिक विकास आराखडा 2021 यामध्येही काही बदलण्याची बदल करण्याची आवश्यकता आहे.

Vishwajit Rane on ODP
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

यासाठीच नगर नियोजन खात्याला भौगोलिक माहिती असणाऱ्या अद्ययावत संगणक प्रणालीची आवश्‍यकता आहे. याकरताच या तंत्रज्ञानासाठीच्या सल्लागार पॅनेलची नियुक्ती करण्याचा निर्णय नगर नियोजन खात्याने घेतला आहे. नगर नियोजन खात्याच्या वतीने मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी ओडीपीसंबंधीची नोटीस काढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com