दाबोळी: नवी दिल्ली (Delhi)येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे (National Defense College)कमांडंट एअर मार्शल डी. चौधरी यांनी अभ्यास दौरयाअतंर्गत महाविद्यालयातील 61 व्या राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक्रमाच्या 113 अधिकारयांसह मुंबई, गोवा, कारवार येथील नौदल तळांना भेटी दिल्या. या अभ्यास पथकामध्ये भारतीय सशस्त्र दलांचे अधिकारी, भारतीय नागरी सेवा व मैत्रीपूर्ण परदेशातील लष्करी व नागरी (Military and civilian)अधिकारयांचा उपस्थित होते.
राष्ट्रीय संरक्षक महाविद्यालाचे (NDC College)पथक 13 ते 15 सष्टेंबरपर्यंत मुंबईत राहिले. या कालावधीत अधिकारयांनी वेस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालय,नेवहल डॉकयार्ड, माझगाव डॉक लिमिटेड, मेरिटाईम वॉरफेअर सेंटर आदी ठिकाणी भेटी दिल्या. तेथे त्यांना संबंधितांच्या भूमिका व जबाबरदारी यासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच वेस्टर्न आरमारच्या युध्दनौकांनी कवायती केल्या.हेलिकॉप्टरांनी(Helicopter) बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिके केले. पाणबुडी ऑपरेशन, नौदल ऑपरेशन संबंधी माहिती देण्यात आली.
या पथकाने गोव्याला भेट दिली. त्यानंतर गोवा नौदल क्षेत्रातील उपक्रमांची माहिती घेतली. त्यांना वेगवेगळया विमांनांची माहिती देण्यात आली. तसेच हवाई (Air force)प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यानंतर या पथकाने नेव्हल एव्हिएशन म्युझियमला भेट दिली. पथकाने कारवार येथील नौदल तळाला भेट दिल्यावर त्या ठिकाणी त्यांना सीबर्ड प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना विमानवाहू युध्दनौका विक्रमादितावर नेण्यात आले. नौदल जहाज दुरुस्ती यार्ड, शिप लिफ्ट सुविधा क्षमता यासंबंधी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
1960 मध्ये स्थापन झालेले राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय ही जागतिक स्तरावरील (World level)नामांकित संरक्षक संस्था आहे. केवळ संरक्षण मर्यादीत कार्यक्षेत्र न ठेवता संपूर्णपणे सुरक्षावर लक्ष केंद्रित करते आहे. सशस्त्र दलांसाठी नव्हे तर नागरी सेवा अधिकाऱ्यांची प्रगत अभ्यासाची सर्वोच्च संस्था आहे. भारतातील वरिष्ठ संरक्षण व नागरी सेवा अधिकारयांसह अनेक मैत्रीपूर्ण परदेशी देशांच्या सुरक्षेच्या समग्र अभ्यासासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे. रणनीती, (Strategy), युध्दाची उच्च (High of war)दिशा व इतर गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून ते संबंधितांना कौशल्ये व ज्ञान प्रदान करण्याचा प्रयत्न करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.