यंदाचा लोकाेत्सव 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत आदर्श ग्राम आमोणे, काणकोण येथे आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती आज सभापती रमेश तवडकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गोव्यातील सामान्य नागरीक, शेतकरी, कलाकार म्हणजे मुळ गोवा असल्याने या लोकोत्सवाला अधिक महत्त्व असल्याचे म्हटले आहे.
(Speaker Ramesh Tawadkar informed that folk festival will be organized from 7th to 11th December )
यावेळी बोलताना तवडकर म्हणाले की, येत्या 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत आदर्श ग्राम आमोणे, काणकोण येथे आदर्श युवा संघातर्फे लोकाेत्सव आयोजित केला जाणार आहे. ‘लोकाेत्सव 2022’ या सोहळ्याला दोन लाखांहून अधिक लोकांचा सहभाग असेे अशी माहिती यावेळी तवडकर यांनी दिली.
गोव्यातील लोकोत्सव हा केवळ फेस्टीव्हल नाहीत तर तो एक विचार आहे. या विचारांना बळकटी देण्याचे काम गोवा सरकार करत आहे. गोव्यातील सामान्य नागरीकांना प्रमाण मानत विकास साधला जाणार आहे. त्यासाठीच सरकार प्रयत्नशिल असल्याचं ते म्हणाले.
लोकोत्सवाबाबत बोलताना सभापती तवडकर म्हणाले की, लोकोत्सव साजरा करताना बाहेरील पर्यटकांना अधिक - अधिक संख्येने सामिल करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यातून गोव्याचा खरा चेहरा देशासमोर येईल. तसेच लोकोत्सवात पर्यटक ज्या प्रमाणात सामिल होतील. त्याप्रमाणात गावातील संस्कृती, परंपरा जपण्यासाठी नागरीक ही प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.