Morjim समुद्रात हॉटेल कर्मचारी बुडाला; पोलीस म्हणाले तो पार्टीत गेला अन्...

मद्यधुंद अवस्थेत हा प्रकार केला असल्याचा पोलिसांचा संशय
Morjim sea
Morjim seaDainik Gomantak

मोरजी समुद्रात एक व्यक्ती बुडाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेला व्यक्ती हॉटेल कर्मचारी असून पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत तो समुद्रात गेल्याने हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

(hotel employee drowned in Morjim sea)

Morjim sea
Crime News: रशियन तरुणीवरील अत्याचार प्रकरणी संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरजी येथे समुद्रात कमल आर्या ( वय 32 ,मुळचा उत्तराखंड ) हा हॉटेल कर्मचारी बुडाला आहे. मयत आर्या हा आश्वे-पेडणे येथील एका क्लबमधील पार्टीमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत समुद्रात गेल्याने बुडाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येईल असे ही पोलिसांनी म्हटले आहे.

Morjim sea
Goa Bus Stand: मडगावात नवे बसस्थानक उभारणार; प्रकल्पावर मंत्र्यांची दिल्लीत बैठक

याबाबत स्थानिकांनी माहिती देताना म्हटले की, रात्री कमल आर्या पेडणे येथे गाडीवरुन प्रवास करत असताना निदर्शनास आला होता. मात्र त्यावेळी पार्टीसाठी गेला की आणखी काही कारणास्तव फिरत होता हे समजू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com