चर्च, पोर्तुगीज, उठाव; सपा नेते अखिलेश यादव डॉ. राम मनोहर लोहिया & गोव्याच्या इतिहासात रमले

अखिलेश यादव यांनी देशात पहिल्यांदा आलेले पोर्तुगीज आणि त्याविरोधात झालेले उठाव यांची माहिती घेतली.
Akhilesh Yadav Keral Visit
Akhilesh Yadav Keral VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Akhilesh Yadav Keral Visit: समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत.

अखिलेश यादव यांनी यावेळी विविध चर्चना भेट दिली. यादव यांनी देशात पहिल्यांदा आलेले पोर्तुगीज आणि त्याविरोधात झालेले उठाव यांची माहिती घेतली. तसेच, गोवा दमन दिव हा प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया यांचे योगदान व संघर्ष यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

कोची येथे 1503 मध्ये बांधलेल्या सेंट फ्रान्सिस चर्चला अखिलेश यादव यांनी भेट दिली. 1498 मध्ये वास्को द गामा हा युरोप ते भारतापर्यंतचा ऐतिहासिक सागरी मार्ग शोधणारा पहिला व्यक्ती होता असे इतिहास सांगतो. चर्चचे पास्टर पीटर यांनी अखिलेश यादव यांचे स्वागत करून त्यांना चर्चच्या इतिहासाची माहिती दिली.

वास्को द गामा हा केरळच्या कालिकत किनाऱ्यावर पोहोचणारा पहिला पोर्तुगीज खलाशी होता. नंतर पोर्तुगीज सैनिक इथे आले आणि त्यांची राजवट गोवा दमण दीव पर्यंत पसरली.

पुढे साडेचार शतके ही राजवट या राज्यात होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील गोवा दमण दीव स्वतंत्र व्हायला 14 वर्षे लागली. 18 जून 1946 रोजी समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध उठाव केला आणि लोकांच्यात स्वातंत्र्याच्या आंदोलनाची ज्योत पेटवली.

Akhilesh Yadav Keral Visit
'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न', ऐन पावसाळ्यात मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात मोठा बदल

डॉ.राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीजांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला तेव्हा त्यांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आला. नंतर हा उठाव देशात सर्वत्र पसरला, मधुलिमायेजींनीही या आंदोलनाची कमान हाती घेतली. 15 ऑगस्ट 1955 रोजी पाच हजार लोकांनी कोचीहून गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीज पोलिसांनी निशस्त्र लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 30 लोक मरण पावले. दरम्यान, 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवत गोवा जिंकला.

दरम्यान, अखिलेश यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जॉय अँटनी यांच्या जाहीर कार्यक्रमालाही हजेरी लावली. अखिलेश यादव यांनी कोची येथे स्थापन झालेल्या 'द अ‍ॅडम  मल्टीलिंगुअल इंटरनेट पोर्टल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संपादक व्यंकटेश रामकृष्णन यांची भेट घेतली. अ‍ॅडम हे इंग्रजी, हिंदी, मल्याळम आणि तमिळ भाषेतील कार्यक्रमांसह एक बहुभाषी इंटरनेट पोर्टल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com