मडगाव: दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या संरक्षण दलाने (Southwestern Railway Defense Force) ‘नन्हे फरिश्ते’ या विशेष ऑपरेशनखाली गत वर्षभरात सुमारे 90 लहान मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या वा बिगर सरकारी संघटनांच्या स्वाधीन करण्याची कामगिरी पार पाडली आहे. त्यात 77 मुलगे तर 13 मुली आहेत.
रेल्वेच्या या विभागाचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त आलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी पार पाडली गेली. हा कायदा 2020 मध्ये अंमलात आला व त्याच्या अंमलबजावणीसाठी अथक परिश्रम या दलाने घेतले. या कायद्यातील तरतुदीखाली प्रवासी तसेच मालवाहतुकीच्या सुरक्षिततेसाठीही या दलाने परीश्रम घेतले. कोविड काळात सोडलेल्या श्रमिक एक्सप्रेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना संरक्षण दिले.
याच काळात या दलाने विविध गुन्ह्याखाली 2785 जणांना अटक करून 80383 रुपयांचा दंड वसूल केला तर यंदा 115 जणांना अटक करून 160087 रुपयांचा दंड ठोठावला. प्रवाशांच्या 619721 रुपये किंमतीच्या 3 वस्तू त्यांना परत केल्या. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 28 तोतयांना पकडून त्यांच्याकडून 1.30 लाख रुपये किंमतीची तिकिटे जप्त केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.