रेल्वेची मालवाहतुकीत विक्रमी कामगिरी, मे महिन्यात 770.71 कोटींचा महसूल; 4.4 दशलक्ष टन मालवाहतूक

South western railway freight revenue may 2026: दक्षिण-पश्चिम रेल्वेने यंदाच्या मे महिन्यात मालवाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
South Western Railway
South Western RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण-पश्चिम रेल्वेने यंदाच्या मे महिन्यात मालवाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या कालावधीत ४.४ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली असून त्यातून ७७०.७१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमडी यांनी दिली.

मे २०२५ मध्ये ४.२२ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. त्या तुलनेत यंदा ४.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी मे महिन्यातील सर्वोच्च मालवाहतुकीचा विक्रम मे २००८ मध्ये ४.२५ दशलक्ष टनांचा होता. त्यामुळे यंदाची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

South Western Railway
Goa Dam Water Level: प्रमुख धरणांतील जलपातळी घसरली! प्रशासनाची चिंता वाढली; मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचे सावट

मे महिन्यात दररोज सरासरी २,२७५ वॅगन्सचे लोडिंग करण्यात आले. मालवाहतुकीमध्ये लोहखनिजाची १.७६६ दशलक्ष टन, पोलादाची ०.९२१ दशलक्ष टन आणि कोळशाची ०.९३ दशलक्ष टन वाहतूक करण्यात आली. कोळसा वाहतुकीत २३.३ टक्के, तर कंटेनर वाहतुकीत १६.९ टक्के वाढ झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मे महिन्यात १६.३६ दशलक्ष प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. त्यातून ३०२.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

South Western Railway
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

पार्सल सेवेतून १३ कोटी!

मे २०२६ अखेरपर्यंत चालू आर्थिक वर्षातील रेल्वेचा एकूण महसूल १,४८१.४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये तिकीट तपासणीतून ५.५३ कोटी रुपये, तर पार्सल सेवेतून १३.८२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पायाभूत सुविधांमधील सातत्यपूर्ण सुधारणा, कार्यक्षम नियोजन आणि मालवाहतुकीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे हे यश मिळाल्याचे डॉ. कनमडी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com