Goa Todays Update News: स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

पणजीतील 3.5 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे तर सांतिनेझ येथील 3 किलोमीटर कामांपैकी 150 मीटरचे ताडमाड ते छोटा पुलापर्यंतचे काम सुरु असून 25 टक्के काम झाले आहे.
Court
Court Dainik Gomantak

स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

राजधानी पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांचा अहवाल उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिलेल्या निर्देशानुसार इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट लिमिटेडच्या मुख्य सरव्यवस्थापक एदुयार्द पेरेरा यांनी आज सादर केला. पणजीतील 3.5 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे तर सांतिनेझ येथील 3 किलोमीटर कामांपैकी 150 मीटरचे ताडमाड ते छोटा पुलापर्यंतचे काम सुरु असून 25 टक्के काम झाले आहे.

Dainik Gomantak

फोंडा येथील अपघात प्रकरणी क्रेन चालक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु

फोंडा येथील कदंब बस स्थानकावरील अपघात प्रकरणी पोलिसांनी क्रेन चालक रणजीत कुमार नागेंद्र प्रसाद ( वय - 20, रा. बसंतीपूर, बिहार) याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

arrested
arrestedDainik Gomantak

पणजीत इंटरटेनमेंट आणि फूड झोनचा विक्रेत्यांचा महापौरांना प्रस्ताव

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आणि विक्रेते यांच्यात बैठक झाली. या बैठकीत विक्रेत्यांनी पणजीमध्ये इंटरटेनमेंट आणि फूड झोनचा प्रस्ताव ठेवला. या झोनमध्ये एकूण 92 विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पाटोला मुख्य फूड आणि इंटरटेनमेंट झोन म्हणून ओळखतात.

Panaji Mayor Rohit Monserrat
Panaji Mayor Rohit MonserratDainik Gomantak

क्रेनखाली सापडून मोटारसायकल पायलट जागीच ठार

फोंडा येथील कदंब बस स्थानकावर सकाळी 9.45 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. क्रेनखाली सापडून मोटारसायकल पायलटचा जागीच मृत्यू झाला.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

बाणावली जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी जोसेफ पिमेंटा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बाणावली जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार जोसेफ पिमेंटा यांनी व्हेंझी व्हिएगस, अमित पालेकर, युरी आलेमाव, दुर्गादास कामत आणि शिवसेना सदस्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली.

Joseph Pimenta for Banavali Zilla Panchayat Elections
Joseph Pimenta for Banavali Zilla Panchayat ElectionsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com