

मडगाव : कुडचडे येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच आज दक्षिण गोव्यात आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी यशवंत हरिजन (वय २६ वर्षे) या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले. गेले वर्षभर तो पीडितेवर अत्याचार करीत होता.
घरच्या मंडळींच्या लक्षात ही बाब आल्यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्याशी संपर्क साधून पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंद केली. पोलिसांनी संशयिताला शोधून काढून त्याच्या हाती बेड्या ठोकल्या.
संशयित यशवंत हा बसचालक असून तो रुमडामळ-दवर्लीत राहतो. तो मूळ कर्नाटकातील गोकाक येथील आहे. पीडित मुलगी मडगावात टेलरिंग वर्गासाठी जात होती. यशवंतने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली आणि नंतर विवाहाचे आमिष दाखविले.
नंतर तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संशयितावर पोक्सो कलम ४, ६, तसेच भारतीय न्याय संहितेच्या ६४ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला अाहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.