South Goa Lawyers Association: दलालगिरी बंद करून म्युटेशन प्रक्रिया पारदर्शक करा; वकील संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Mutation Process: जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात एजंटगिरी सुरू असल्याची तक्रार सदस्यांनी मांडली
Mutation Process: जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात एजंटगिरी सुरू असल्याची तक्रार सदस्यांनी मांडली
South Goa Collector Office camcatches
Published on
Updated on

मडगाव: जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेत गैरव्यवहार सुरू असून एजंटांकडून कामे करून घेतली जात असल्याचा तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे कामे होत असल्याचा दावा दक्षिण गोवा वकील संघटनेने केला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकायांना पत्र पाठवून मामलेदार कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेतील दलालगिरी बंद करून म्युटेशन प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा वकील संघटनेतर्फे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना पत्र सादर करत म्युटेशन प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याची मागणी केली. संघटनेच्या बैठकीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात एजंटगिरी सुरू असल्याची तक्रार सदस्यांनी मांडली.

लोकांनी म्युटेशनसाठी अर्ज केल्यास आठवडाभराचा कालावधी लागतो, तर एजंटद्वारे म्युटेशन केले गेल्यास २४ तासांत म्युटेशन केले जाते. यासाठी मोठी रक्कमही एजंटना द्यावी लागते.

एजंटनी आणलेल्या कागदपत्रांद्वारे तत्काळ म्युटेशन प्रक्रिया पार पडते, पण इतरांनी केलेल्या अर्जातील कागदपत्रांत त्रुटी दाखवल्या जातात व नागरिकांना वारंवार खेपा माराव्या लागतात. याशिवाय म्युटेशन अर्ज ऑनलाइन ट्रॅकींग सुविधा पूर्ववत करण्यात यावी.

यामुळे फाईल्सबाबत नेमकी माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. या सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष देत म्युटेशन प्रक्रिया पारदर्शक, एजंटांच्या हस्तक्षेपाविना योग्य कागदपत्रांच्या आधारे करण्यात यावी, अशी मागणी दक्षिण गोवा जिल्हा वकील संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Mutation Process: जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युटेशन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात एजंटगिरी सुरू असल्याची तक्रार सदस्यांनी मांडली
South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती

एजंटांवर कठोर कारवाईची गरज

मामलेदार कार्यालयांतील म्युटेशनसाठी जास्त रक्कम आकारणाऱ्या एजंटांवर कडक कारवाई करण्यात यावी. म्युटेशन प्रक्रियेसाठी ठरावीक कालावधी ठरवण्यात यावा व कालबद्धतेमध्ये लोकांची कामे करण्यात यावीत. या प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com