Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

South Goa Mutation Process Corruption Allegations: जमीनविषयक दावे हाताळणाऱ्या सासष्टी मामलेदार कार्यालयात म्युटेशन प्रक्रिया करताना तसेच जमीन नोंदणी कार्यालयात मालमत्तांचे पार्टीशन करण्यासाठी एजंटांना मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागतात.
South Goa Mutation Process Corruption Allegations
Land Mutation ProcessDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: जमीनविषयक दावे हाताळणाऱ्या सासष्टी मामलेदार कार्यालयात म्युटेशन प्रक्रिया करताना तसेच जमीन नोंदणी कार्यालयात मालमत्तांचे पार्टीशन करण्यासाठी एजंटांना मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागतात. या दोन्ही कार्यालयांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप दक्षिण गोवा वकील संघटनेने केला आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज वकिलांनी मामलेदार कार्यालयावर मोर्चा काढला.

मामलेदार कार्यालयात तसेच जमीन नोंदणी कार्यालयात म्युटेशन आणि पार्टीशनसाठी दाखल केलेले दावे कोणताही निर्णय न घेता प्रलंबित ठेवले जातात, असा आरोप वकिलांनी केला. हे दावे का अडवून ठेवले जातात, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी वकिलांनी केली.

South Goa Mutation Process Corruption Allegations
Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष आंतोन क्लोविश दा कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मामलेदार कार्यालयाकडून पुरेसे स्पष्टीकरण न मिळाल्याने वकिलांनी नंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांची भेट घेतली. संबंधित मामलेदार कार्यालयाशी चर्चा करून ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत कशी करता येईल, याचा विचार करून एक सर्वसाधारण कार्यपद्धती तयार करण्याचे आश्वासन क्लिटस यांनी यावेळी दिले.

गरज नसताना वेळकाढूपणा : यासंबंधी बोलताना काही वकिलांनी सांगितले की, या दोन्ही कार्यालयांत जमीनविषयक दावे हाताळताना अनावश्यक वेळकाढूपणा केला जातो. एजंटामार्फत संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचत नाहीत, तोपर्यंत दावे मंजूर केले जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. विविध कारणे पुढे करून कामे अडवून ठेवली जातात; मात्र, ज्यांच्याकडून पैसे मिळतात, त्यांचे दावे तत्परतेने निकाली काढले जातात. यासाठी एजंट ४० ते ५० हजार रुपये आकारतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.

South Goa Mutation Process Corruption Allegations
Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com