South Goa Hospital: द.जिल्हा इस्पितळात 10 दिवसांत भरती! मंत्री राणेंनी दिली माहिती; 50 परिचारिका, अधिकारी, डॉक्टरांची होणार नियुक्ती

Vishwajit Rane: वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर भरतीसाठी मुलाखती प्रक्रिया सुरू आहे, जशी निवड होते तशी नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: पुढील आठवड्यात जास्तीत जास्त दहा दिवसांत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ५० परिचरिका, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्र्वजीत राणे यांनी शुक्रवारी इस्पितळाच्या भेटीवेळी पत्रकारांना दिली.

वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर भरतीसाठी मुलाखती प्रक्रिया सुरू आहे, जशी निवड होते तशी नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

फोंडा, कुडचडे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची यादी तयार करून सरकारकडे पाठवली आहे. मंजुरी मिळाली की लगेच पूर्तता केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याचा शब्द दिला आहे तो पाळणारच. पण जोपर्यंत ओर्थोपेडिक, युरोलोजी सुविधा उपलब्ध होत नाही, आयसीयूची क्षमता वाढत नाही तोपर्यंत आम्हाला वेगळ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल असेही राणे यांनी सांगितले.

गरज पडली तर प्रसंगी डॉक्टरांची नियुक्ती कंत्राट पद्धतीने सुद्धा केली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या सर्व गोष्टीना मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Vishwajit Rane
Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

गोव्यात १०० ॲम्बुलन्सची गरज आहे. कमीत कमी २५ तरी ॲम्बुलन्सची गरज भागविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Vishwajit Rane
Mapusa District Hospital: धक्कादायक! सहा महिन्यांच्या बाळाला शौचालयात टाकून आई पसार; म्हापसा सरकारी रुग्णालयातील घटनेने खळबळ

पाहणीनंतर आयुश इस्पितळाचे उद्‍घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मोती डोंगर वरील आयुश इस्पितळाची पाहणी करण्यास सांगितले आहे. पुढील काही दिवसांत पाहणी करून आढावा घेतला जाईल. आपणच ही जागा शोधली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com