द. गोवा जिल्हा इस्पितळाच्या, पार्किंग समस्येवर काढला तोडगा

द. गो. जिल्हा इस्पितळ: मागील बाजूस लवकरच वाहनांची सोय
South Goa District Hospital
South Goa District HospitalDainik Gomantak

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वाहन पार्किंगसंदर्भात होणारी गैरसोय लवकरच दूर होणार आहे. तेथील पार्किंग समस्येवर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने तोडगा काढला असून वाहने ठेवण्यासाठी हॉस्पिटल मागील भागाचा उपयोग करण्यात येणार आहे.

राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने पार्किंगसंदरभातील या तोडग्याचे नागरिकांनी स्वागत केले असले, तरी हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल केला जात आहे.

South Goa District Hospital
‘ईडीसी’कडून गोवा सरकारला 12.80 कोटींचा व्याज परतावा

दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल आता पूर्णपणे कार्यरत झाल्याने रुग्णांची, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची तसेच रुग्णांची विचारपूस करण्यास येणाऱ्यांना दुचाकी किंवा चारचाकी वाहने पार्क करण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हॉस्पिटलमध्ये दरदिवशी वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून इस्पितळाच्या पुढील भागात पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही.

1 एप्रिल 2022 पासून नवा वाहन कायदा लागू केल्याने दंडाची रक्कमही भरमसाट वाढवलेली आहे. त्यामुळे कुठेही वाहने पार्क करता येत नसल्याने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

South Goa District Hospital
डिचोलीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार

सुरवातीला हॉस्पिटलच्या कुंपणाबाहेर वाहने पार्क करता येत असत, पण आता ती जागा पुरेसी नसल्याने मुख्य हमरस्त्यावर वाहने ठेवली जातात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत असतो. हॉस्पिटलच्या तळघरात पूर्वी वाहने ठेवण्याची व्यवस्था होती, पण आता डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने तळघरात केवळ त्यांना वाहने ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

कुडतरीचे उपसरपंच ब्रायन जेम्स परेरा यांनी पत्रकारांना सांगितले, की आपण सासऱ्याला घेऊन हॉस्पिटलात गेलो असताना आपले वाहन तळघरात ठेवण्यासाठी गेलो, पण तिथे आपल्याला सुरक्षा रक्षकांनी अडविले. यापूर्वी आपण तळघरातच वाहन ठेवत होतो असे सांगितले तरी त्याने ऐकले नाही व वाहन हॉस्पिटलच्या बाहेर ठेवण्यास सांगितले. आता पोलिसांनी दंड दिला तर त्याला कोण जबाबदार असा प्रश्र्न उपसरपंचाने केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com