‘ईडीसी’कडून गोवा सरकारला 12.80 कोटींचा व्याज परतावा

'84 लाख रुपये लाभांश लवकरच दिला जाईल'
12.80 crore interest to be paid by EDC to Goa Government
12.80 crore interest to be paid by EDC to Goa Government

पणजी: राज्याच्या साधन सुविधांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या गोवा आर्थिक विकास महामंडळाला सरकारकडून प्राप्त भागभांडवलाचा व्याज परतावा म्हणून 12.80 कोटी रुपये आज सरकारला देण्यात आले. याशिवाय 84 लाख रुपये लाभांश लवकरच दिला जाईल, अशी माहिती ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

12.80 crore interest to be paid by EDC to Goa Government
मोरजी मैदानाची दुर्दशा; दुरुस्ती रखडली

तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा व्याजाच्या रकमेचा धनादेश दिला. यावर्षी महामंडळाला 52 कोटी रुपये नफा झाला असून गतवर्षी तो 73 कोटी होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की गोवा आर्थिक विकास महामंडळाचा कारभार इतरांसाठी आदर्श असून इतर महामंडळांनीही याच पद्धतीने आपला कारभार करणे गरजेचे आहे.महामंडळे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झाली तरच ती चालतील.

महामंडळांकडून मुख्यमंत्री रोजगार योजना राबविण्यात येत असून या पुढच्या काळातही असे उपक्रम चालूच राहतील. युवकांना रोजगार संधी उपलब्ध देण्यासाठी महामंडळ कार्यरत असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com