Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

South Goa District Hospital Poor Facilities: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि परिसरात वाहणाऱ्या सांडपाण्यावरून ‘आप’ने नाराजी व्‍यक्त केली आहे.
South Goa District Hospital Poor Facilities
Hospital InfrastructureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि परिसरात वाहणाऱ्या सांडपाण्यावरून ‘आप’ने नाराजी व्‍यक्त केली आहे. तसेच आरोग्य सुविधा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे.

‘आप’चे युवा विभागाचे अध्यक्ष नेश कुतिन्हो आणि मुख्य प्रवक्ते पियो केविन यांनी ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात हा मुद्दा उपस्थित करून आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले.

South Goa District Hospital Poor Facilities
Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

गेल्या महिन्यात रुग्णालयात गर्दीमुळे रुग्णांना खुर्च्या, स्ट्रेचर आणि जमिनीवर उपचार घ्यावे लागल्याचा दावा पक्षाने केला. प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने जिल्हा रुग्णालयावरील ताण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने आश्वासनांऐवजी आरोग्य व्यवस्थेत प्रत्यक्ष सुधारणा कराव्यात, अशी मागणी ‘आप’ने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com