...तर ‘त्या’ चिरेखाणींवर कारवाईचा इशारा

दक्षिण गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठ्यांना सर्वेक्षणाचे आदेश
Mining in Goa
Mining in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर चिरेखाणी आणि अन्य खाणीवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याचे ठरवले असून, दक्षिण गोव्याच्या उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना एका आदेशानुसार आशा खाणींचे तलाठ्यामार्फत सर्वेक्षण करून त्या संबंधीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा अशी सूचना केली आहे.

दक्षिण गोव्याच्या (South Goa) उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांनी हा आदेश जारी केला असून, प्रत्येक उपजिल्हाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अशा बेकायदेशीर खाणी सुरू आहेत का? त्याची तापसणी करून घ्यावी असे म्हटले आहे. ज्या खाणी सुरू आहेत त्यांच्या मालकाकडे त्यासाठी अधिकृत परवाना आहे का याची खातरजमा करून 4 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

Mining in Goa
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता कॅमेऱ्याची नजर

जर दक्षिण गोव्यात कोणतीही बेकायदेशीर खाण (Mining) आढळली, तर त्या खाणीवर कडक कारवाईचे संकेत उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांनी दिले आहेत. त्यामुळे खाणमालकांचं मात्र धाबं दणाणल्याचं चित्र आहे. गोव्यात अनेक बेकायदेशीर (Illegal) चिरेखाणींसह अन्य प्रकारच्या खाणी सुरु असल्याची शक्यता आहे. तलाठ्यांनीही आता उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासणी करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com