उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता कॅमेऱ्याची नजर

नगरसेवकांची सूचना, मुरगावातील समस्यांवर पालिका बैठकीत चर्चा
Garbage Problem in Goa
Garbage Problem in GoaDainik Gomantak

वास्को : मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुरगाव पालिका आता उपाययोजना करणार आहे. यासाठी मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय, मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना नगरसेवकांनी केली आहे. तसंच वास्कोतील भटक्या गुरांसंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी सरकारी योजनेनुसार सदर भटक्या गुरांना पकडून गोशाळेत त्यांची सोय करण्याच्या विषयावर चर्चा करून ठराव संमत करण्यात आला.

Garbage Problem in Goa
फोंडा तालुक्यात काँग्रेसची दयनीय स्थिती कशामुळे?

घरोघरी कचरा गोळा करण्याच्या उपक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली. तसेच कचऱ्यासाठी प्रतिमहिना ठराविक रक्कम संबंधितांकडून घेतली जाते. परंतु भविष्यात असे न करता वार्षिक रक्कमच घरपट्टीच्या रक्कमेत मिळवावी. इतर पालिका जी पद्धत अमलात आणतात तशीच मुरगावातही आणावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मुरगाव पालिका क्षेत्रामध्ये अवैध बांधकामे असल्याने त्यांना घरपट्टी लागू झालेली नाही. त्यामुळे काही अडचणी (Problem) उभ्या राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. येथे किती घरांना घरपट्टी आहेत व किती घरांना घरपट्टी नाही, यासंबंधी सर्वेक्षण करूनच पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले.

Garbage Problem in Goa
मडगावात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कचऱ्याचं साम्राज्य

मान्सूनपूर्व कामासंबंधीही चर्चा करण्यात आली. पावसाळा नजीक येऊन ठेपल्याने कामाला गती देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. गतवर्षी मुरगाव (Mormugao) पालिका मंडळावर प्रशासक असल्याने मान्सूनपूर्व कामे ठरावीक वेळेत पूर्ण न झाल्याने वास्कोवासीयांना काही अडचणींना सामोरे जावे लागले होते. मान्सूनपूर्व काम लवकर व्हावी, यासाठी योग्य ती संमती घेऊन रोजंदारीवरील कामगार घ्यावेत. त्या कामगारांना यापूर्वी वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांनी कामाला नकार दिला होता. त्यामुळे त्यांचे वेतन वेळेवर मिळेल यासंबंधी खबरदारी घेण्याची सूचना नगरसेवक दीपक नाईक यांनी केली.

प्रभाग क्रमांक 12 च्या बायणा मासळी मार्केटसमोरच्या कचरा संकलन केंद्रामध्ये इतर प्रभागांतील कचरा टाकण्यात येत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा (Garbage) गोळा होतो. बरेचजण कचरा रस्त्यावर टाकत असल्याने पादचारी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्याची गरज नाईक व्यक्त केली. शहर भागातील काही कचरा स्थळांच्या जागांचे सौंदर्यीकरण करण्यासंबंधी शमी साळकर यांनी सूचना मांडली. तसेच गटारांतील गाळ उपसा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com