Goa Illegal Sand Mining: सावर्डेत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या आठ होड्या जप्त; कुडचडे पोलिसांची कारवाई

जप्त केलेला मुद्देमाल बंदर कप्तान खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
Illegal Sand Mining At Zuari
Illegal Sand Mining At ZuariDainik Gomantak

Goa Illegal Sand Mining: राज्यात बेकायदेशीर वाळू उपश्याचे प्रकार सुरुच आहेत. कुडचडे पोलिसांनी सावर्डे येथे जुवारी नदीत बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 8 होड्या व सक्शन पंप जप्त करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल बंदर कप्तान खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Illegal Sand Mining At Zuari
37th National Games Goa 2023: गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल प्रज्वलित

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केपेचे उप अधीक्षक निलेश राणे यांनी कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक व इतर पोलिसांच्या सहकार्याने पथकाने दक्षिण गोव्यातील सावर्डे येथे जुवारी नदीत तपासणी केली.

यावेळी वाळू उपसा करणासाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या व सक्शन पंप खारफूटी वनांच्या आत ठेवल्याचे आढळून आले. या तपासणीत 8 होड्या व सक्शन पंप जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमाल बंदर कप्तान खात्याकडे देण्यात आला.

Illegal Sand Mining At Zuari
37th National Games Goa 2023: क्रीडा संघटनांची माघार; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल अनावरणाला लावणार हजेरी

अशीच एक कारवाई काही दिवसांपूर्वी जुवारी नदीत करण्यात आली होती. कुडतरी येथे हार्बर किनारी पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात 16 लाख रुपये किमतीच्या दोन होड्या व एक सक्शन पंप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com