Goa Recruitment : नोकरभरतीचा मार्ग मोकळा, दक्षिण गोव्याच्या १४७ पदांच्या भरतीला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी १४७ पदभरतीची घोषणा केली आहे. अलीकडच्या काळात सांगे आणि फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळेही भरतीला विलंब झाला होता.
Goa Recruitment
Goa RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण गोव्यातील रखडलेली नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून १४७ पदे भरण्यासाठी पुन्हा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा जारी केल्या गेल्या आहेत.

यापूर्वी दक्षिण गोव्यातील काही जागांसाठी भरतीची जाहिरात जारी केली होती.त्याला हजारो तरुणांनी अर्ज केले होते. तथापि, ती भरती प्रक्रिया विविध कारणांनी सतत रखडत गेली. आता काही वर्षे विलंब आणि पदरी आलेल्या निराशेनंतर त्या पदासाठी पुन्हा नोकर भरती केली जाणार

आहे.

Goa Recruitment
Goa Senior Citizen: ज्येष्ठांना प्राधान्याने न्याय द्या; फेडरेशने मांडली मंत्र्यांसमोर गाऱ्हाणी

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे गोव्यातील रोजगार इच्छुक तरुणांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने १४७ रिक्त पदांसाठी पुन्हा भरती सुरू केली आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या या भरती मोहिमेत सुरुवातीला सुमारे २४,६६८ अर्ज आले होते.

Goa Recruitment
तथ्यहिन! '2015 पासून कॅनडा नागरिकाविरुद्ध गुन्हा घडलेला नाही', गोवा DGP चे स्पष्टीकरण

परंतु विविध अडथळ्यांमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर टाकावी लागली होती.

आता जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी जाहीर सूचना जारी केली आहे. त्यांनी गट ''क'' मधील पदांसाठी अर्ज करण्याच्या सूचना पात्र उमेदवारांना दिल्या आहेत.

 भरतीमध्ये पुढिल पदांचा समावेश असणार

भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये कनिष्ठ लघुलेखक, तलाठी, निम्न विभाग लिपिक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी ही पदे आहेत. तसेच एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज आणि सैनिक कल्याण विभागातील पदांचाही त्यात समावेश आहे. नोटीसीनुसार, उमेदवारांसाठी कौशल्य चाचणी २९ सप्टेंबरपासून सुरू होतील. त्यानंतर प्राथमिक परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर पात्र ठरलेल्यांसाठी लेखी परीक्षा होईल.

अडथळ्यांची शर्यत

उल्लेखनीय म्हणजे, १४७ रिक्त जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज सादर करण्यात आले होते. २०१९ मध्ये सुरू झाल्यापासून भरती प्रक्रियेला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

South Korea former president sentenced
medicine shortage in Goa hospital
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
contractors to be blacklisted in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com