South Goa: दक्षिण गोव्यात पोलिस कारवाईचे दीड शतक; एक लाखांहून अधिक दंड वसूल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
South Goa
South GoaDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa: नाताळ आणि नवीन वर्षाचे (X’mas & New Year) स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा व प्रशासन व्यवस्थित रहावे यासाठी गोवा पोलिस (Goa Police) सतर्क झाले आहेत. विशेषत: राज्यातील वाढलेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. दक्षिण गोव्यात गुरूवारी पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Violation) करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दंड वसूल केला.

South Goa
Colva: कोलवा येथील हॉटेलमध्ये आढळला अमेरिकन नागरिकाचा मृतदेह

दक्षिण गोव्यात वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तविद्यामाने कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 151 वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 8 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

South Goa
Goa Petrol Diesel Price : गोव्यात येण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची स्थिती; वाचा आजचे ताजे दर

अल्पवयीन वाहनचालकांवर लक्ष

वाहतुकीला शिस्त लागावी, राज्यातील अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी राज्य सरकारने अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास थेट वाहनमालकाला अटक करण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांवर करावाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी म्हापसा, कोलवाळ आणि हणजूण येथे कारवाई करत वाहने जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com