South Goa : मंत्रिपद दिलेले आलेक्‍स सिक्वेरा ठरले अपयशी : प्रयत्‍न अपुरे

South Goa : नुवेतील मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्‍याचे आव्‍हानच
Alex Sequeira
Alex SequeiraDainik Gomantak

South Goa :

सासष्टी, लोकसभा निवडणुकीत खास करून दक्षिण गोव्यात पक्षाला फायदा व्हावा म्हणून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील आठ आमदारांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यात नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचाही समावेश आहे.

एवढेच नव्हे तर कुडचडेचे भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांचा बळी देऊन त्यांना मंत्रिपदही दिले. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला त्‍याचा तिळमात्र फायदा झाला नाही.

यावेळी भाजपला नुवेत केवळ २६७७ म्हणजे २०१९ पेक्षा फक्त १५२ मते जास्त पडली. या उलट काँग्रेस उमेदवाराला १६,३६५ मते म्हणजेच १३,६८८ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली. विधानसभा निवडणुकीत आलेक्स सिक्वेरांना ८७४५ मते पडली होती. नुवेत भाजपची २५०० मते आहेत. त्यामुळे सिक्वेरांची मते जमेस धरल्यास भाजपला कमीत कमी सात ते आठ हजार मते मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र शेवटी अपेक्षाभंगच झाला.

Alex Sequeira
Goa Today's News: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता हटवली

याचा अर्थ आलेक्स सिक्वेरा यांनी नुवेच्या मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला नाही असा होत नाही. त्यानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विश्र्वासात घेऊन अनेक सरकारी योजना नुवेतील नागरिकांपर्यत पोहोचविल्या. एका इंग्रजी शाळेला मान्यता मिळवून दिली. काही युवकांना

वीज खात्यात नोकरीत कायम केले. रस्त्याचे डांबरीकरण, भूमिगत सिवरेज पाईपलाईनीचे काम पूर्ण केले. काही प्रमाणात पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांना जमीन देणे, घरे बांधून देण्याचे आश्‍‍वासनही दिले. शेतकरी वर्गाला शेतीसाठी ते मदत करतच होते. नुवेच्या सर्वांगीण विकासासाठी आपले हात बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र नुवेतील लोकांनी मतदानाद्वारे सिक्वेरांच्या भाजप प्रवेशाला एका प्रकारे विरोधच दर्शविला.

एवर्सन वालेस ठरले काँग्रेससाठी देवदूत

नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको, विल्‍फ्रेड डिसा, राधाराव ग्रासियस यांनी आपापल्या परीने मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. एवर्सन वालेस या समाजसेवकाची भूमिकाही काँग्रेसला भक्कम आघाडी देण्यास महत्वाची ठरली असे बोलले जाते. कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद होतेच व आहेत.

पण ते पक्षासाठी एकत्र आले. शिवाय पक्ष सोडून गेलेल्या काही नेत्यांनीसुद्धा मतभेद विसरून एकजुटीने काम केल्‍याने पक्षाला मोठी आघाडी घेणे शक्य झाले. नुवेतील केवळ पाच मतदान केंद्रांमध्ये भाजपला तीन अंकी मते मिळाली. सर्वाधिक ३२० मते मतदान क्रमांक एकवर मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com