पणजीत आज घुमणार ‘ओस्सय ओस्सय’चा नाद

शहरातील 18 जून रस्त्यावर शोभायात्रा होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.
Panaji Shigmotsav 2022
Panaji Shigmotsav 2022 Dainik Gomantak

पणजी: राजधानी पणजीत उद्या पणजी शिगमोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून ‘ओस्सय ओस्सय’च्या गजराने राजधानी दुमदुमून जाणार आहे. शहरातील 18 जून रस्त्यावर शोभायात्रा होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे.

चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा यांच्या सहाय्याने भव्य निनादात शोभायात्रा निघणार असून झांज पथक, ढोलताशांचा निनादात पणजीचा परिसर दुमदुमणार आहे. सांतिनेज-पणजी येथील सावरीकडील देवाच्या घुमटीत नारळ वाढवून व गाऱ्हाणे घालून पणजी शिगमोत्सव समितीचे मानद अध्यक्ष श्रीनिवास धेंपे व इतर पदाधिकारी आशीर्वाद घेऊन सायंकाळी 4 वाजता शोभायात्रेला काकुलो बेटाकडून सुरुवात करतील. वेशभूषा स्पर्धेतील स्पर्धकांचे एकेक करून आगमन होईल. त्याला जोडून लोकनृत्य पथके आणि रोमटामेळ पथके पुढे सरकतील आणि संध्याकाळी तिन्ही सांजेवेळी भव्य आकर्षक चित्ररथांचे आगमन होईल.

Panaji Shigmotsav 2022
'गोव्यात खाजन शेती पुनर्जीवित करणार'

पणजी शिगमोत्सव समितीने आज रायू चेंबर्समधील आपल्या कार्यालयात चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य अशा स्पर्धक पथकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यात समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक, कोषाध्यक्ष संदीप ए. नाईक, समन्वयक संदीप ए. नाईक यांचा समावेश होता.

शोभायात्रेचा आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने आबालवृद्ध तसेच अनेक ठिकाणचे पर्यटक येतात. त्यांना चित्ररथांचा आनंद घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तिष्ठावे लागू नये म्हणून वेळेवर स्पर्धकांनी आपले सादरीकरण करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. उशिरा नोंदणी करणाऱ्यांना स्पर्धेत सहभागी करून न घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. शोभायात्रा काकुलो बेटाकडून सुशिला बिल्डिंगसमोरून पुढे आराम हॉटेल, हिंदू फार्मसीकडून कॅफे रिअलसमोरील रस्त्यावरून आझाद मैदानाकडे येऊन विसर्जित होणार आहे. या मार्गावर जुने शिक्षणखाते व इतर काही ठिकाणी महनीय व्यक्तींची बसण्याची सोय करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com