'गोव्यात खाजन शेती पुनर्जीवित करणार'

वीरेश बोरकर: सांत आंद्रेतील खाजन शेतजमिनीची पाहणी
 शेती
शेतीDainik Gomantak

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात असलेल्या खाजन शेत जमिनी पुनर्जीवित करणार आहोत. सामुदायिक शेतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत,अशी माहिती आरजीपीचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली.

बोरकर यांनी आज शुक्रवारी सकाळी तिसवाडी मामलतदार, तलाठी, जलस्त्रोत खात्याचे अधिकारी, मुंडकार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नेवरा-मंडूर खाजन शेतजमिनीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 शेती
मुख्यमंत्री प्रमोद सावंत झालेत सावध

या खाजन जमिनीत गेल्या एक दशकापासून खारे पाणी शिरण्याची समस्या भेडसावत आहे. क्षारयुक्त पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांना शेती करता येत नाही. यापूर्वी अनेक सर्वेक्षणे, तपासण्या करण्यात आल्या. व नावापुरत्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांनी ह्या खाजन शेत जमिनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी कधीही गांभीर्याने काम केले नाही. खाजन शेतातील समस्यांकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज सुमारे ७५० शेतकरी त्रस्त आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

फुटलेल्या बांधाची तात्काळ दुरुस्ती काम सुरू करण्यात येणार आहे. खाजन शेतीत लागवड करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. खाजन शेतजमीन व शेतकऱ्याची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बोरकर यांनी दिली.

 शेती
Mopa Airport: 24 तासांत मागण्या मान्य करा; अन्यथा तीव्र आंदोलन

खाजन शेतीसंदर्भात प्राधान्याने एक सामायिक बैठक घेणार असल्याचे तिसवाडीचे मामलतदार व इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनीही मनमोकळेपणाने अधिकाऱ्यांशी बोलून समस्या व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या देखरेखीखाली खाजन शेत जमिनीतील बांधांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com