Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda Municipality: फोंडा पालिकेचा सोपोकर 75.36 लाख निर्धारित

फोंडा पालिकेच्या बैठकीत पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणचा सोपोकर 75 लाख 36 हजार 288 रुपये निर्धारित करण्यात आला आहे.
Published on

Ponda Municipality: फोंडा पालिकेच्या बैठकीत पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणचा सोपोकर 75 लाख 36 हजार 288 रुपये निर्धारित करण्यात आला आहे. हा सोपो कर 2023 ते 2024 पर्यंत आकारण्यात येणार असून येत्या मार्चमध्ये सोपो कराची मुदत संपत असल्याने 1 एप्रिलपासून हे नवे सोपो कंत्राट सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या सोपोकराचे कंत्राट देण्यात येणार आहे.

यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी आज पालिकेत बैठक घेण्यात आली. फक्त एकच सोपोकराचा विषय बैठकीत ठेवण्यात आला होता.

फोंडा पालिका क्षेत्रातील आत्ताचा सोपोकर येत्या 31 मार्चपर्यंत संपत असल्याने पुढील आर्थिक वर्षापासून नवीन सोपोकर लागू होणार आहे.

फोंडा पालिकेच्या मार्केट शेडमधील विक्रेत्यांचा सोपोकर पालिकेतर्फे गोळा करण्यात येणार आहे.

Ponda
Government Scheme: सामाजिक योजनासुद्धा दलालीच्‍या विळख्‍यात; काँग्रेसची गोवा सरकारवर खरमरीत टीका

फक्त शेडबाहेरील विक्रेत्यांसाठी सोपो कंत्राटदारामार्फत सोपोकर गोळा करण्यात येणार आहे. फोंडा पालिकेच्या या बैठकीला नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना नाईक डांगी तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com