Margao Municipal Council: ‘सोनसोडो’च्या आराखड्याला संमती

दैनंदिन कचरा संकलनासाठी निविदा मंजूर
Margao Municipal Council
Margao Municipal Councildainik gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Council: मडगाव पालिका मंडळाची खास बैठक झाली. या बैठकीत 10 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या आराखड्याला संमती देण्यात आली.

तसेच रोज दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी मे. ग्रीन ग्लोब सेल्फ हेल्प ग्रुप व बापू एनव्हायर्मेंट सोशल सर्विसेस ऑर्गनायझेशन या कंत्राटदारांच्या निविदांना संमती देण्यात आली.

बापू ऑर्गनायझेशन मडगाव तर ग्रीन ग्लोब कंपनी फातोर्डा येथे कचरा गोळा करणार आहे. त्यासाठी त्यांच्या अंदाजे 3.90 कोटींच्या निविदा संमत केल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

कचरा गोळा करण्याचा खर्च 14व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या रकमेतून केला जाईल. त्यामुळे पालिकेवर या खर्चाचा भार पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Margao Municipal Council
Goa News : १० वर्षीय बालकाने वाचवले तिघांचे प्राण

7 कोटींचे अंदाजपत्रक

सोनसोडोची सर्व कामे सप्टेंबर 2023पर्यंत पूर्ण केली जातील. यात प्रकल्पाच्या भिंती बांधणे, रस्ता दुरुस्ती व कॉक्रिटीकरण करणे, खतासाठी शेड बांधणे, सांडपाणी एकत्रित करण्यासाठी टाक्या बांधणे, एमआरएफ शेड उभारणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे या कामांचा समावेश आहे. यासाठी अंदाजे ७ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

नागरी विकास मंडळ कोण?

कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदारांच्या निविदांना पालिका मंडळाने मंजुरी द्यावी, अशी गोवा राज्य नागरी विकास मंडळाची सूचना आहे, असे सांगितल्यावर ‘अशी सूचना पालिका मंडळाला करणारे गोवा राज्य नागरी विकास मंडळ कोण’, असा प्रश्र्न नगरसेवक घन:श्याम शिरोडकर यांनी उपस्थित केला. पालिका मंडळाला स्वत:चे अस्तित्व व अधिकार आहेत, असेही शिरोडकर यांनी ठणकावून सांगितले.

Margao Municipal Council
Illegal Mining in Goa: कुडणेत अवैध खाण व्यवसायावर डिचोली पोलिसांची कारवाई; 31 ट्रक जप्त

सुमारे 52 लाखांची तरतूद

सोनसोडो प्रकल्पात 14व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या रकमेतून 51.71 लाख रुपये खर्चून ट्रान्सफार्मर उभारणे व त्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. तीन-चार महिन्यांत सोनसोडोचे सर्व प्रश्र्न सुटतील, असा विश्र्वास नगराध्यक्ष शिरोडकर यांनी व्यक्त केला.

सध्या कचऱ्यातून जे सांडपाणी बाहेर येते, त्यासाठी लिचेट टाक्या बांधण्यात येत आहेत. काँक्रिट रस्ता दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे आहे. सुमारे 1.44 कोटी रुपये खर्चून सोनसोडो प्रकल्पाच्या भिंती बांधल्या आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com