सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

sonsodo garbage project medical waste: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीनंतर सोनसोडो कचरा प्रकल्प परिसरात २० टन वैद्यकीय कचरा आढळल्यानंतर या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही.
sonsodo garbage project medical waste:
sonsodo garbage project medical waste:Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीनंतर सोनसोडो कचरा प्रकल्प परिसरात २० टन वैद्यकीय कचरा आढळल्यानंतर या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही यासाठी मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कायद्याअंतर्गत कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी सोनसोडो कचरा प्रकल्प परिसरात सॅनिटरी कचरा सापडला होता. मडगाव कॉंग्रेस ब्लॉकचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पत्रकारांना नेऊन तो दाखवला होता.

या प्रकाराची दखल घेऊन गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लगेच पाहणी केली व पाहणीवेळी तिथे २० टन वैद्यकीय कचरा आढळून आला होता.

sonsodo garbage project medical waste:
Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

मुख्याधिकाऱ्यांनी समर्पक उत्तर दिले नाही तर कारवाई करावी लागेल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन लेविन्सन मार्टीन्स यांनी पाठवलेल्या नोटिसीत स्पष्ट केले आहे.

sonsodo garbage project medical waste:
Goa Weather: पारा घसरला! थंडीची लाट कायम, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळीही घरांमध्ये गारवा

उत्तर देण्यास आठ दिवसांची मुदत

मुख्याधिकाऱ्यांनी या नोटिसीला आठ दिवसांच्या आत उत्तर पाठविण्यास सांगितले आहे. शिवाय दर महिन्याला किती वैद्यकीय कचरा एकत्रित झाला व त्याची विल्हेवाट कशी लावली याचा अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com