Sonsodo Cemetery
Sonsodo CemeteryDainik Gomantak

Sonsodo : सोनसोडो कब्रस्थानाच्या जागेवरुन नवा वाद; रेखांकनापूर्वी नोटीस न पाठवल्याने नाराजी

राय आणि बोर्डा येथील लोकांचा आक्षेप: वाट कोणती हेही स्पष्ट नाही
Published on

सोनसोडो येथे कब्रस्थान ऊभे करण्यासाठी मडगाव नगर पालिका आणि जी सूडा यंत्रणेने रेखांकन करण्याचे काम हाती घेतले आहे खरे पण या कब्रस्थानात जाण्यासाठी वाट कोणती हे स्पष्ट केलेले नाही आणि हे काम सुरू करताना इतर संबंधितांना विश्वासातही घेतले नाही असा अक्षेप राय आणि बोर्डा येथील लोकांनी घेतला.

या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी पूर्वी या कब्रस्थानाला विरोध केला होता. मात्र हा विषय उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने हे काम अग्रक्रमाने हाती घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर काल मडगाव पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. आजपासून रेखांकन करण्याचे काम सुरू होणार होते. मात्र राय आणि बोर्डा येथील नागरिक त्या जागेवर उपस्थित झाल्याने हे काम सुरु झालेच नाही.

आमचा या प्रकल्पाला विरोध नाही मात्र हे काम सुरू करण्यापूर्वी जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक होती तीच पूर्ण केलेलीं नाही. याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही येथे आलो होतो अशी माहिती रायचे पंच सदस्य झेवियर फर्नांडीस यांनी दिली.

Sonsodo Cemetery
Accident : कारचालक महिलेची दुचाकीला धडक; पणजीत अपघात

ही कब्रस्थानची जागा तीन समाजासाठी देण्यात आली असून सध्या जे काम चालू आहे त्या जागेच्या बाजूची जागा राय चर्चच्या तर दुसऱ्या बाजूची जागा बोर्डा कपेलच्या मालकीची आहे. हे रेखांकनाचे सुरू करण्यापूर्वी या दोन्हीं संस्थांना नोटीस पाठविण्याची गरज होती. ती नोटीस अजून पाठविलेली नाही याकडे फर्नांडिस यांनी लक्ष वेधले.

वास्तविक तिन्ही धर्माच्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी यापूर्वी आके येथे 99 हजार चौरस मीटर जमीन ताब्यात घेतली होती. त्या जागेवर हे कब्रस्थान का येत नाही हे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी फर्नांडीस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com