Goa Politics: गिरीश चोडणकर आभासी दुनियेत

निवडणुकीला केवळ तीन महिने असताना कॉग्रेस पक्षाची प्रचंड नामुष्की
Goa Politics: Girish Chodankar
Goa Politics: Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आपल्याच विश्वात मश्गूल असताना आणि त्यांचे काही होयबा या नेत्याची तळी उचलून धरीत असल्याने तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) गोव्यात धमाका निर्माण केला आहे. काँग्रेस (Congress) पक्षाला गेल्या पाच वर्षांत गोव्यात (Goa) राजकीय काम करता आले नाही. 2017 मध्ये सत्तेला कवटाळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर या पक्षाचे नीतिधैर्य गळाले.

दिगंबर कामतसह अनेकांना सरकारला प्रखर विरोध करता आला नाही आणि गिरीश चोडणकर सतत अपयशी होत गेले. तरीही आपणच सत्तेवर येणार या आभासी दुनियेत वावरल्याने निवडणुकीला केवळ तीन महिने असताना या पक्षाला प्रचंड नामुष्की सहन करावी लागत आहे. लुईझिन फालेरो तृणमूलच्या गळाला लागल्यानंतर या पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ आमदार पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Goa Politics: Girish Chodankar
Goa Election 2022: सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्धार

‘नवे पक्ष मतात फूट घालणारे’

कॉंग्रेस पक्षाने गोव्याची अस्मिता नेहमीच जपली आहे. गोमंतकीयांच्या संवेदना जाणणारा व भावनांचा आदर करणारा पक्ष म्हणून गोमंतकीयांनी नेहमीच कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवला आहे. आता नव्याने गोव्यात राजकारण करू पाहणारे पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट घालणार आहेत. गोमंतकीय जनता राजकीय जुगार व करामतींना बळी पडणार नसून कॉंग्रेसलाच विजयी करणार आहेत, असा दावा गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांनी केला.

फालेरो यांची मनिच्छा

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी गांधी घराण्याशी एकनिष्ठ असतानाही तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फालेरो आता वृद्ध झाले आहेत. पूर्वीसारखा जोश राहिला नाही यात तथ्य आहे, परंतु सत्तरी ओलांडलेल्या फालेरोंना अजूनही राजकारणात सक्रिय रहावेसे वाटते आणि आपल्यानंतर पुत्राने राजकारणात यावे, अशी त्यांची मनिच्छा आहे. हे घडू शकते ते केवळ तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतरच. कारण त्यांना राज्यपालपद मिळाल्यास आपल्या पुत्राने नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी फालेरो प्रयत्न करणार आहेत. त्यांच्याबरोबर चर्चिल आलेमाव यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केल्यास आसपासचे दोन - तीन मतदारसंघ ते ताब्यात घेऊ शकतील, असा या द्वयींचा होरा आहे. आलेमाव यांनाही आपल्या मुलीला राजकारणात आणण्याचे सध्या डोहाळे लागले आहेत.

Goa Politics: Girish Chodankar
Goa Politics: फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

आलेक्स रेजिनाल्डसुद्धा अस्वस्थ!

आलेक्स रेजिनाल्ड हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. चोडणकर यांच्यावर जाहीरपणे टीका करणाऱ्या अवघ्याच नेत्यांपैकी ते एक आहेत, परंतु त्यामुळे पक्षाचे निष्ठेने काम करूनही त्यांच्या वाट्याला अपमानच आला. ‘मी पक्षाच्या कामात कधी तडजोड केली नाही, त्यामुळे संघटना अधिक क्रियाशील बनावी या उद्देशानेच मी बोलतो. पक्षाने त्यानुसार आवश्यक बदल केले असते, तर आज काँग्रेस पक्षाची ही अवस्था झाली नसती’, असे सूतोवाच फालेरो यांच्या पक्ष त्यागाच्या पूर्वसंध्येवर रेजिनाल्ड यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com