Goa Mining: ..अखेर डिचोलीत ट्रक धावले! खनिजवाहतूक बेकायदेशीर,अवमान करणारी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

Goa Mineral Transportation Issue: खनिज वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्ता वापरण्यास सरकारकडून मान्यता मिळताच दुपारी खनिज वाहतूक करणारे ट्रक नवीन रस्त्यावरून धावले.
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on
Updated on

Vedanta Mining Bicholim Mineral Transportation Trucks

डिचोली: डिचोलीतील खनिज वाहतुकीचा गुंता अखेर सुटला आहे. तब्बल २२ दिवसांनंतर आजपासून ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरू झाली. खनिज वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्ता वापरण्यास सरकारकडून मान्यता मिळताच दुपारी साडेतीन वाजता खनिज वाहतूक करणारे ट्रक नवीन रस्त्यावरून धावले. मात्र, आज केवळ ५० च्या आसपास ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले होते.

२० नोव्हेंबर रोजी पिळगावमधील शेतकऱ्यांनी अचानक रस्त्यावर उतरून माठवाडा जंक्शनजवळ खनिज वाहतूक रोखली होती. तेव्हापासून आज दुपारपर्यंत खनिज वाहतूक बंद होती. अखेर याप्रश्नी तोडगा निघाल्याने दुपारी साडेतीन वाजता ट्रक रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय ट्रकमालकांनी घेतला. रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतूक करण्याचा पर्याय असला, तरी आज रात्री खनिज वाहतूक करण्याचे ट्रकमालकांनी टाळले. उद्या बहुतेक सर्व ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरविण्याची तयारी ठेवली आहे.

दरम्यान, खनिज वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिल्याने ट्रकमालकांनी समाधान व्यक्त केले असून, सरकारला धन्यवाद दिले आहेत. नियमांचे पालन करून खनिज वाहतूक करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी खनिज वाहतूक हा पर्याय सोयीस्कर असून, रात्रीच्या खनिज वाहतुकीबाबत विचार करण्यात येणार आहे, असे ट्रकमालक संघटनेचे सरचिटणीस सुभाष किनळकर यांनी म्हटले आहे.

Goa Mining
Goa Politics : खरी कुजबुज: डॉ. प्रमोद सावंतांना मिळणार एक्स्टेंशन?

न्यायालयाचा अवमान; शेतकऱ्यांचा दावा

‘एसओपी’प्रमाणे सायंकाळी ५ वा. खनिज वाहतूक बंद केली. मात्र, सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यास विरोधाचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. त्यामुळे पिळगाव-सारमानस रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आज शेतकऱ्यांनी खनिज वाहतुकीला विरोध दर्शविला नाही; परंतु आज सुरू झालेली खनिज वाहतूक बेकायदेशीर आणि न्यायालयाचा अवमान करणारी आहे, असे अनिल सालेलकर आणि अन्य शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Goa Mining
Goa Mining Issue: 22 दिवसानंतर गुंता सुटला, 'वेदांता'ची खनिज वाहतूक सुरु; कायमचा तोडगा काढण्याची मागणी

रात्री वाहतूक करण्यास मुभा

खाणीवरील रस्ता अडविल्याने पिळगाव जंक्शन ते सारमानस या रस्त्याने खनिज वाहतुकीस परवानगी द्यावी, या वेदांता कंपनीच्या प्रस्तावाला सरकारने परवानगी दिल्याची माहिती मिळाली. सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्रीही वाहतूक करण्याचा पर्याय दिला आहे. विश्रांतीची वेळ सोडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत खनिज वाहतूक करता येणार आहे. दिवसा ताशी ४० आणि रात्री ताशी ५० ट्रिप खनिज वाहतूक करण्याची मुभा दिल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com