Som Yag Yadnya 2023: अग्निहोत्राचे पाच नियम आणि मंत्र तुम्हाला माहितीये?

Som Yag Yadnya 2023 Agnihotra
Som Yag Yadnya 2023 AgnihotraGomantak Digital
Published on
Updated on

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले (एमडी आयुर्वेद)

अग्निहोत्र विधीत ठिक स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी दोन-दोन चिमटी गायीच्या तुपाने माखलेल्या तांदळाच्या आहुती अग्नीत अर्पण केल्या जातात. पिरॅमिड सदृश आकाराच्या ताम्रपात्रात गायीच्या गोवऱ्यांपासून अग्नि प्रज्वलित केला जातो. अग्नित आहुती अर्पण करीत असताना दोन सरळ सोप्या मंत्रांचे उच्चारण केले जाते.

अग्निहोत्र सर्वदाता आहे. -परमसद्‍गुरू श्री गजानन महाराज

अग्निहोत्र प्रक्रियेमुळे वातावरण पवित्र होऊन परिणाम स्वरूप मनावरील ताण-तणाव दूर होतो. पर्यावरणाचे चक्र संतुलित होते. सुर्योदयाच्या अग्निहोत्राचा सुपरिणाम त्या स्थानी संध्याकाळ पर्यंत राहतो व सूर्यास्ताच्या अग्निहोत्राचा सुपरिणाम सकाळपर्यंत राहतो. ज्या स्थानी अग्निहोत्र नित्य होते,तेथे हे कल्याणकारी चक्र अविरत चालू राहते.

महासोमयाग ही विश्वकल्याणसाठी केली जाणारी प्रक्रिया आहे. तेच लाभ आपल्याला व आपल्या कुटूंबाला रोज मिळावेत यासाठी वेदांनी कथन केलेली एक अदभूत प्रक्रिया म्हणजेच ‘अग्निहोत्र’ होय. काळाच्या ओघात लुप्तप्राय झालेल्या या तंत्रज्ञानाचे पुनरुज्जीवन शिवपुरी, अक्कलकोट येथून परमसद्‍गुरु श्री गजानन महाराज यांनी केले. आपल्याला वा आपल्या परिवाराला सुख, समृध्दी व मन:शांती प्राप्त करुन देणाऱ्या या वैदिक प्रक्रियेस युगधर्म म्हटले गेले आहे.

अग्निहोत्राच्या पुढील पाच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

समय :- नित्य स्थानिक सूर्योदय व सूर्यास्तवर केले पाहिजे. सूर्योदय - सूर्यास्त ही दिवसातील महत्वपूर्ण तालचक्रे असून त्यांच्याशी अग्निहोत्र विधीची सांगड घातली आहे. अग्निहोत्र वेळांना संधीकाल असे म्हणतात. ही वेळ म्हणजे ना दिवस ना रात्र ना प्रकाश ना अंध:कार. वेदांनी या संधीकालाला ''मुक्तीचे स्थान'' (तीर्थ) असे म्हटले आहे. योगशास्त्राप्रमाणे आपल्या इडा आणि पिंगळा नाडी आलटून - पालटून सतत चालत असतात. ठिक सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी परिवर्तन होऊन स्वास्थ्यकारक सुषुम्ना नाडी क्रियाशिल होते आणि मन व शरिराचे स्वास्थ्य संतूलित होते. अग्निहोत्र याच वेळी केल्याने त्याचा लाभ मन व शरीर यांच्या संतुलनावर होतो.

Som Yag Yadnya 2023 Agnihotra
Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणाऱ्या यज्ञ उत्सवाची ६ वैशिष्ट्ये माहितीये का?

पिरॅमिड आकाराचे पात्र :- अग्निपात्र तांब्याचे असते. ताम्र धातूत रोगजंतूचे वाढीस निरोधन करण्याचा गुणधर्म आहे. विद्युत चुंबकिय शक्ती व विद्युत यांचा उत्तम वाहक असणारा ताग्रधातू अम्निहोत्रात विशेष महत्वाचे कार्य करतो. अग्निहोत्र पात्राचा आकार पिरॅमिड सारखा आहे. Pyramid शब्दाचा अर्थ pyro + amid भौमितिक दृष्ट्या एक असा विशिष्ट आकार ज्याच्या मध्यात स्वास्थ्यकारक सूक्ष्मशक्ती आहे.

गोवंशाच्या गोवऱ्या :- अग्निहोत्रासाठी लागणारा अग्नि हा गाय किंवा बैल म्हणजे गोवंशाच्या वाळलेल्या गोवऱ्यांपासून केला जातो. आयुर्वेदिय व अन्य चिकित्सा पध्दतीनुसार गायीच्या शेणात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

गोधृत तांदूळ :- अग्निहोत्राच्या आहुतीसाठी केवळ गायीचे शुध्द तूप वापरले जाते. त्याचे औषधी गुणधर्म सर्वश्रृत आहेत. आयुर्वेदाप्रमाणे गोधृत सर्वश्रेष्ठ पुष्टिदायक, तृष्टिदायक, विषध्न तथा ओजदायक आहे. अग्निहोत्रामध्ये अर्पण केलेल्या गायीच्या तुपाच्या ज्वलनाने त्याचे औषधी गुणधर्म वातावरणात वेगाने पसरतात.

मंत्र:- अग्निहोत्राचे दोन वेळेस म्हणावयाचे दोन सोपे मंत्र असे ;

सुर्योदय:-

सूर्याय स्वाहा। सूर्याय इदं न मम ।।

प्रजापतये स्वाहा । प्रजापतये इदं न मम ।।

सूर्यास्त:-

अग्नये स्वाहा। अग्नेय इदं न मम ॥

प्रजापतये स्वाहा । प्रजापतये इदं न मम ।।

या मंत्राच्या उच्चाराने मनावर व वातावरणावर शुध्दिकारक पावनकारी परिणाम होतो. हे मंत्र मन:शांती व प्रेमाच्या सुक्ष्म लहरी वाताराणात प्रसृत करतात. ''सूर्य'', ''अग्नि'', ''प्रजापती'' हे शब्द परमपिता परमात्मवाचक आहेत. त्यांच्या उच्चारणाने त्याग व शरणागतीची भावना निर्माण होऊन विकसित होण्यास सहाय्य होते.

Som Yag Yadnya 2023 Agnihotra
Som Yag Yadnya 2023: सोमयागाचे पुनरुज्जीवन करणारी व्यक्ती कोण?

अग्निहोत्र विधी सार्वत्रिक असून कोणीही त्याचे सहजपणे आचरण करु शकतो. त्यात जात-पात, धर्म ,सांप्रदाय, देश, वेष, भाषा, स्त्री, पुरुष अशा भेदभावांना स्थान नाही. अग्निहोत्र घरातील कुठल्याही खोलीत करता येते. घराजवळील बागेत अथवा शेतात देखील ते केले जाते. अग्निहोत्र हे शेतीसाठी वरदान आहे. प्रत्यक्ष अग्निहोत्र करणारी व्यक्ती वा जागा आवश्यकतेनुसार बदलू शकतो. सायं-प्रात: अग्निहोत्र आचरणात काही निमित्ताने खंड पडल्यास त्याविषयी विशेष चिंता न करता पुढील लगेच येणाऱ्या संधी समस्याला अग्निहोत्र आचरण करावे.

(लेखक हे गुरुमंदिर,बाळाप्पा मठ, अक्कलकोट व विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि श्री गजानन महाराज, शिवपुरी, अक्कलकोट यांचे नातू आहेत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com