Som Yag Yadnya 2023: सोमयागाचे पुनरुज्जीवन करणारी व्यक्ती कोण?

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023Gomantak Digital
Published on
Updated on

Som Yag Yadnya 2023 Goa

गोमंतभूमीतील पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धनासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन केले आहे. म्हापसा येथे ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सकाळ, गोमन्तक आणि गोमन्तक टाइम्सतर्फे ‘सोम याग यज्ञ महोत्सव २०२३’ होईल. यानिमित्त सोमयागाचं पुनरुज्जीवन कोणी केले हे जाणून घेऊया...

सोमयाग अगदी बंदच झाले. ते कसे असतात, ते कमीत कमी कळावे यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करावे लागले. ते कार्य गजानन महाराजांनी केले.

वेदकाळापासून सुरू असलेल्या या सोमयागाचे पुनरुज्जीवन कुणी केले हे पाहणे त्या निमित्ताने उचित ठरेल. दोन हजार वर्षांपर्यंत सोमयाग सर्रास होत असल्याने त्याविषयीची माहिती अगदी छोट्या मुलांनाही होती. तो त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातला प्रकार होता. आता सोमयाग क्वचितच पाहायला मिळतो. मधल्या काळामध्ये त्याला कर्मकांड वगैरे अशी नावे ठेवून त्याला हळूहळू बंद पाडण्यात आले. त्याची कारणमीमांसा आपण नंतर पाहू.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणाऱ्या यज्ञ उत्सवाची ६ वैशिष्ट्ये माहितीये का?

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपणा सर्वांना ज्ञात आहेत. त्यांचे उत्तराधिकारी, त्यांच्यापुढील उत्तराधिकारी असे करत करत अग्निहोत्र करणारे गजानन महाराज म्हणून एक सिद्धपुरुष होऊन गेले. अक्कलकोटच्या जवळ एक तीनचार किलोमीटर अंतरावर शिवपुरी हे स्थान आहे. कितीतरी माणसे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला या ठिकाणी अग्निहोत्र करताना पाहिली असतील. अग्निहोत्राची ही आधुनिक पद्धत या गजानन महाराजांनी सुरू केली. खरी अग्निहोत्राची परंपरा आपल्याकडे वेदकाळापासून आहेच आहे. चोवीस तास गुणिले तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरामध्ये अग्नी विझू न देता त्याला आहुती द्यायची, असे जे व्रत अंगीकारले जाते, त्याला अग्निहोत्र म्हटले जाते.

पूर्वीच्या काळी असे बहुतांश सगळेच अग्निहोत्र करत असत. आधुनिक युगात अशाप्रकारे अग्नी बाळगणे शक्य नाही. वाढते इतर व्याप, शहरीकरण अशी अनेक कारणे त्यामागे आहेत, पण चोवीस तास गुणिले तीनशे पासष्ट दिवस अशा प्रकारे अग्नी बाळगणे आता शक्य नाही. असा अग्नी बाळगण्याऐवजी त्याचा जो मुख्य गाभा आहे, ज्यात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी, वेळ न चुकवता विशिष्ट मंत्रांनी आहुती देणे, असे त्याचे आधुनिक स्वरूप गजानन महाराजांनी विकसित केले आणि त्याचा प्रचार, प्रसार केला. पुढे तेच प्रचलित झाले. पण, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचे पेव फुटले की, त्याचा अतिरेक करण्याची वाईट खोड आहे. त्या अतिरेकातून काही चुकीचे पायंडे पडत जातात. त्यानंतर त्याच्याविरोधात जोरदार क्रांती वगैरे होते आणि ते बंद पडते.

Som Yag Yadnya 2023
Som Yag yagya 2023: वेद म्हणजे काय?

चांगल्या गोष्टीचा अतिरेक त्या गोष्टीच्या मुळावर येतो. चांगली गोष्ट असूनही ती बंद पडते इतकेच नव्हे तर त्याची आठवणही राहत नाही. अशा पद्धतीने चांगल्या गोष्टी नाश पावतात. त्याला पुनरुज्जीवित करण्याची वेळ काही काळानंतर वेळ येते. पूर्वीच्या काळी जंगली श्वापदे ही त्रासदायक असतात आणि म्हणून त्यांची शिकार केली जात असे. यातून राजे, संस्थानिक यांची युद्धनीती, शस्त्रास्त्रे यांचा अभ्यासही होत असे आणि रयतेचे जंगली श्वापदांपासून संरक्षणही होत असे. या शिकार करण्याचा इतका अतिरेक झाला की, जंगली श्वापदांबरोबर अनेक वन्यजीव, प्रजाती नष्ट पावू लागले. त्यामुळे, त्यावर बंदी आणावी लागली. जंगली प्राण्यांची शिकारच करायची नाही, अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे सोमयागाचा इतका अतिरेक झाला की, त्याच्या जागी दुसरी वैशिष्ट्यपूर्ण मोहीम उभी राहिली. ती होती उपासनेची. त्यामुळे, सोमयाग अगदी बंदच झाले. ते कसे असतात, ते कमीत कमी कळावे यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करावे लागले. ते कार्य गजानन महाराजांनी केले. त्यानंतर अशाप्रकारे अग्निहोत्रे व्हायला लागली.

आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अग्नी हा फार महत्त्वाचा मानला गेला आहे.  विष्णू, शिव या प्रत्यक्ष न दिसणाऱ्या देवतांची उपासना जशी आहे, तशीच निसर्गामध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या घटकांचीही उपासना आहे. सूर्योपासना, अग्नीची उपासना वगैरे आपल्या संस्कृतीत सांगितली गेली आहे. मधल्या काळात लोप पावल्यामुळे अग्नीच्या संदर्भातील ही मूळ साधना होती, तिचे मूळ गाभा तोच ठेवून आधुनिकीकरण केलेले रूप,  म्हणजे गजानान महाराजांनी सुरू केलेले अग्निहोत्र. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास हजारो वर्षांनंतर गजानन महाराजांनी पहिला सोमयाग केला. त्यानंतर हळूहळू सोमयागही प्रचलित होत गेला. अर्थात तो पूर्वीइतका सर्रास न होता, क्वचित प्रसंगी होऊ लागला. आर्थिक व इतर व्यावहारिक बाजूही सोमयाग सर्रास न होण्यास कारणीभूत आहेत. पण, तरीही सोमयाग पुनरुज्जीवित झाला हे महत्त्वाचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com