

मडगाव: कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आणखी काही मुली पुढे येण्याची शक्यता आहे. सोहमच्या वासनेची शिकार झालेल्या बहुतेक मुली १५ ते १७ वयोगटातील असल्या तरी काही मुली १८ आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या असल्याची माहिती पुढे आली आहे.
माहितीनुसार, त्याच्या लैंगिक छळाला बळी पडलेल्या मुलींची संख्या आतापर्यंत २० वर पोहोचली असून त्यात भर पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या मुली फक्त कुडचडे आणि जवळपासच्याच भागातील नसून गोव्यातील अन्य भागांमधील असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.
त्याच्या वासनेच्या शिकार झालेल्या मुली या १० वीपासून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली असल्याची माहिती समोर आली आहे. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांची स्तुती करून आकर्षित करणे, याला ‘ग्रुमिंग’ म्हणतात. सोहम या बाबतीत पटाईत होता.
२०२३ पासूनच त्याने हे कारनामे सुरू केले होते. मुलींना ग्रुम करण्यासाठी तो चार-पाच महिने घालवायचा. एकदा ती मुलगी पाशात सापडली, की तो तिचा गैरफायदा घ्यायचा. आवदा व्हिएगस यांच्या मते, अशा ग्रुमिंगमुळे मुली फसतात. त्यामुळे कायद्याने असे ‘ग्रुमिंग’ करणे, हा गुन्हा ठरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार करणे हा गुन्हा आहेच. शिवाय अशा गुन्ह्यात तयार केलेली क्लिप्स व्हायरल करणे, ती डाऊनलोड करणे, मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवणे, हा देखील गुन्हा आहे. एवढेच नव्हे, तर कुणालाही अशा गुन्ह्याची माहिती असेल आणि ती माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली तरी तो गुन्हा असून तो शिक्षापात्र आहे. त्यामुळे कुडचडे लैंगिककांडाची कुणाला माहिती असल्यास ताबडतोब पोलिसांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोहम नाईक यांचा भाजपाकडे कोणताच संबंध नाही. या प्रकरणात भाजपाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कुडचडे भाजपा मंडळ अध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक प्रदीप नाईक, आशिष करमली व राजेंद्र नाईक उपस्थित होते. प्रकरणाचा योग्य तपास सुरु असून काही लोक यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्यांनी सांगितले. कुडचडे प्रकरणाचा आम्ही पूर्णपणे निषेध करीत असून याचा पोलीस सखोल तपास करीत आहे व आता हा तपास गुन्हा अन्वेशण खात्याकडे दिले असल्याने तपास योग्य प्रकारे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.