

मडगाव: अल्पवयीन मुलींचे सुरुवातीला ‘ग्रुमींग’ करुन नंतर त्यांच्यावर ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत चार प्रकरणात अटक केलेल्या कुडचडे येथील सोहम नाईक याला पाचव्या प्रकरणात अटक करण्याची सध्या तरी पोलिसांना गरज भासत नाही, अशा आशयाचे निवेदन क्राईम ब्रँचकडून दक्षिण गोवा सत्र न्यायालयाला सादर करण्यात आले.
या पाचव्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी साेहम नाईक याच्याकडून प्रधान सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला असून आज या अर्जावर सुनावणी झाली. या अर्जावरील निकाल २७ एप्रिलपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.
या पाचव्या प्रकरणात सोहमकडून एका २० वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार क्राईम ब्रँचकडे नोंदविली होती. त्यानंतर सदर युवतीची न्यायदंडाधिकार्यांसमोर जबानीही नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणात युक्तिवाद करताना सोहमचे वकील ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी या युवतीने जी जबानी दिली आहे त्यात आपल्या अशिलाच्या विरोधात कोणतीच तक्रार केल्याचे दिसत नाही, असा दावा केला. तर हस्तक्षेप याचिकेवर युक्तिवाद करताना ॲड. प्रियेश मडकईकर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपल्या अशिलाने जी जबानी दिली आहे, ती न्यायालयाने गृहित धरावी, अशी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.