Curchorem Crime News: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीला कोर्टाचा दिलासा! जामीन केला मंजूर, पण घातली 'ही' अट

Curchorem Sexual Exploitation Case: आरोप निश्चित करण्याबाबत निर्णयासाठी पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.
Curchorem Sexual Exploitation Case
Curchorem Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कुडचडे येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी सोहम नाईक याला पणजीतील फास्ट ट्रॅक विशेष पॉक्सो न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याला दक्षिण गोवा जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आरोप निश्चित करण्याबाबत निर्णयासाठी पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, गुन्हे दक्षिण गोव्यात घडले असून पीडित मुली आणि साक्षीदारही याच भागात राहतात. त्यामुळे आरोपीने खटला संपेपर्यंत उत्तर गोव्यातच राहावे आणि तेथील पडताळणी केलेला स्थानिक पत्ता न्यायालयाला सादर करावा.

Curchorem Sexual Exploitation Case
Fonda Pocso Court Case: लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार! 22 वर्षीय तरुणावर; पॉक्सो कलम 376 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे कोर्टाने आदेश दिले

न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याला दक्षिण गोव्यात जाता येणार नाही. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि तितक्याच रकमेच्या एका जामीनदाराच्या हमीवर नाईकची सुटका केली. पीडित मुली, त्यांचे कुटुंबीय किंवा साक्षीदारांशी सोशल मीडिया अथवा अन्य माध्यमातून संपर्क साधणे, त्यांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्यास मनाई केली आहे.

तसेच आठ दिवसांत पासपोर्ट न्यायालयात जमा करणे, तपासात सहकार्य करणे आणि सुनावणीस नियमित उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पीडित मुलींचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.

Curchorem Sexual Exploitation Case
POCSO Case Goa: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

प्रकरण काय?

सोहम नाईक याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनविल्याचा आणि त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा, गोवा बाल कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Firing Case Latest Update
Goa POCSO Case
Supreme Court POCSO Case Goa
POCSO Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com