Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

Goa Crime News: १२ डिसेंबर २०२३ रोजी शिरदोन येथे झालेल्या अपघातात ओमकार आरोस्कर आणि संजना सावंत यांच्या दुचाकी समोरासमोर धडकल्याने संजनाचा जागीच मृत्यू झाला होता.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत अपघाती मृत्यूप्रकरणी सात दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यास पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिरदोन येथे समाज कार्यकर्त्यांनी दिला. याप्रकरणी आगशी पोलिसांकडून मुद्दाम वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

१२ डिसेंबर २०२३ रोजी शिरदोन येथे झालेल्या अपघातात ओमकार आरोस्कर आणि संजना सावंत यांच्या दुचाकी समोरासमोर धडकल्याने संजनाचा जागीच मृत्यू झाला होता, तर बहीण अक्षता सावंत ही गंभीर जखमी झाली होती. पोलिस तपासात ओमकारने अतिवेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती; परंतु प्रथम तक्रार आणि आता आरोपपत्र दाखल करण्यासही जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्वरित आरोपपत्र दाखल होईल याची काळजी घ्यावी, अशी मागणी समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो, शंकर पोळजी आणि संजनाच्या आई-वडिलांनी केली आहे.

Goa Police
Margao Drowning Death Case: मडगांव - रायतळे येथे कमळे काढताना युवकाचा तळ्यात बुडून दुर्दैवी अंत

संशयित पोलिस अधिकाऱ्यांचा भाचा

अपघातासाठी कारणीभूत युवक हा पोलिस उपअधीक्षक जीवबा ढळवी यांचा भाचा असून आगशी पोलिसांनी प्रथम तक्रार नोंदवण्यास विलंब केला होता. आता पुन्हा आरोपपत्राबाबतही तसेच सुरू आहे. तपास अधिकारी नारायण पिंगे हे निलंबित झाल्याने विलंब होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे.

Goa Police
Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

विलंबास लटके कारण

अधिकारी निलंबित झाला, ही पोलिस खात्याची समस्या असून त्याचा परिणाम तपासावर होणार नाही, याची काळजी पोलिस महासंचालकांनी घेतली पाहिजे. साहाय्यक अधीक्षक सुलेखा जगरवाल यांनी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही सात दिवस वाट पाहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com