Margao Drowning Death Case: मडगांव - रायतळे येथे कमळे काढताना युवकाचा तळ्यात बुडून दुर्दैवी अंत

Margao Drowning Death Case: दरम्यान लोटली येथील तळ्यातही एक अज्ञात व्यक्ती बुडाल्याची माहिती असून अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू
Drowning Death Case
Drowning Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Drowning Death Case: मडगांव कुडतरी रायतळे या ठिकाणी कमळ काढण्यासाठी गेलेल्या एकाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी हाती येतेय. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कामासाठी गोव्यात आलेल्या तीन परप्रांतिय कामगारांपैकी शंकर वडार (38) हा कामगार मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बुडाला असून रात्री 9 वाजेपर्यंत त्याचे शोधकार्य सुरु आहे.

Drowning Death Case
Mahadayi Water Dispute: म्हादईच्या मुद्द्यावर सिद्धरामय्या- मोदींची भेट; प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीची केली मागणी

दरम्यान मृत शंकर हा बेळगाव येथील असून तो या तळ्यातील कमळे काढून बेळगाव येथे विकत होता.मंगळवारी सायंकाळी शंकर सोबत आणखी दोघे परप्रांतीय कमळे काढण्यासाठी राय येथील तळ्या उतरले असताना शंकर हा पाण्यात खेचला गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

त्याच शोध घेण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप शोधकार्य सुरु आहे. दरम्यान लोटली येथील तळ्यातही एक अज्ञात व्यक्ती बुडाल्याची माहिती असून मायणा कुडतरी पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com