स्मृती इराणींच्या मुलीचा 'त्या' बारशी संबंध नाही, आरोप निराधार असल्याचे वकिलाचे स्पष्टीकरण

गोवा उत्पादन शुल्काकाडून कोणत्याही प्रकारचे कारणे दाखवा नोटीस मिळाले नाही
Smriti Irani
Smriti IraniDainik Gomantak 

गोव्यातील अवैध बार प्रकरणाशी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची मुलगी झोईश (Zoish) हिचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असून आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचे स्पष्टीकरण झोईश यांचे वकिल किरत नागरा यांनी आज (दि.23) दिले. झोईश यांनी देखील एका निवेदनाद्वारे अवैध रेस्टॉरंट, बारची मालकी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वकिल किरत नागरा म्हणाले, झोईश यांना गोवा उत्पादन शुल्काकाडून कोणत्याही प्रकारचे कारणे दाखवा नोटीस मिळाले नाही. राजकीय नेत्याची मुलीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिच्यावर आरोप लावले जात आहेत. इराणी यांची मुलगी 18 वर्षांची असून, शेफचे शिक्षणासाठी ती वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम केले आहे. लहान मुलीला चुकीच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरा म्हणाले.

Smriti Irani
स्मृती इराणींच्या गोव्यातील हॉटेलचा अबकारी खाते परवाना बेकायदेशीर ?

नेमकं प्रकरण काय आहे?

स्मृती इराणी यांच्या कुटुंबियांशी संबंधित रेस्टॉरंटला कायद्याचे उल्लंघन करून विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीसाठी परवाना जारी केल्याचा आरोप केला जात आहे. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आरटीआयद्वारे मागविलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने 18 फेब्रुवारी 2021 रोजी कायद्याचे उल्लंघन करून अँथनी डगमा यांच्या नावाने परवाना दिल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे. दरम्यान, अँथनी डगमा यांचे गेल्या वर्षी म्हणजेच 17 मे 2021 रोजी निधन झाले असतानाही त्यांच्या नावाने परवान्यांचे नूतनीकरण केले. असे कागदपत्रावरून दिसून येत आहे.

कायद्याचे उल्लंघन करून स्मृती इराणी कुटुंब चालवत असून, उत्पादन शुल्क अधिकारी आणि आसगाव पंचायत यांच्या संगनमताने केलेल्या या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी शुक्रवारी (दि.22) पत्रकार परिषदेत घेत, पंतप्रधानांनी स्मृती इराणी यांचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. गोव्यासह देशात सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत असून, उलट सुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Smriti Irani
Smriti Irani वादात; गोव्यातील बेकायदेशीर बारप्रकरणी काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com