स्मृती इराणींच्या गोव्यातील हॉटेलचा अबकारी खाते परवाना बेकायदेशीर ?

17 मे 2021 रोजी निधन झालेल्या व्यक्तीच्या नावे झाले परवान्याचे नूतनीकरण
SMRITI IRANI’S FAMILY RESTAURANT IN GOA
SMRITI IRANI’S FAMILY RESTAURANT IN GOADainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गोव्यातील आसगांव येथील बार अँड रेस्टॉरंटला बेकायदेशीरपणे अबकारी परवाना जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाकडे आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेल्या अर्जात ही माहिती समोर आली असल्याचा दावा त्यांनी आहे. ( Aires Rodrigues SAY SMRITI IRANI’S FAMILY RESTAURANT IN GOA WAS ILLEGALLY GIVEN EXCISE LICENCE )

SMRITI IRANI’S FAMILY RESTAURANT IN GOA
रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यात तीन कर्मचाऱ्यांना अटक

रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्काचे नियम केवळ विद्यमान रेस्टॉरंट बारसाठीची परवानगी मिळाली आहे, मात्र उत्पादन शुल्क विभागाने 18 फेब्रुवारी 2021 रोजी कायद्याचे उल्लंघन करत परदेशी दारुच्या किरकोळ विक्रीसाठी परवाना जारी केला गेला. आणि किरकोळ विक्रीसाठी दुसरा परवाना जारी केला. मात्र याला कायद्यानुसार आवश्यक असलेले परवाना सादर न करता दिल्याचा दावा रॉड्रिग्स यांनी केला आहे.

SMRITI IRANI’S FAMILY RESTAURANT IN GOA
'आम्ही अशी गाडी नाही की ज्यात पेट्रोल भरता येईल': Ben Stokes

स्मृती इराणींचे कुटुंब चालवते हॉटेल

परवाना देताना उत्पादन शुल्क विभागाने श्री अँथनी डगमा यांच्या नावाने परवाना दिला आहे, त्यानुसार ते मुंबईचे रहिवासी आहेत. तसेच हा परवाना 30 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला. यासाठी आसागाव येथील भौता वड्डो येथे 1200 चौरस मीटरच्या विस्तीर्ण जागेचे परवाने उत्पादन शुल्क परवाने दिले होते. जे आता कायद्याचे उल्लंघन करून स्मृती इराणी कुटुंब चालवत आहे. अशी माहिती समोर आली आहे.

महाघोटाळ्याची सखोल चौकशी करा

आरटीआय दस्तऐवजांमध्ये असेही उघड झाले आहे की, गेल्या महिन्यात 29 जून रोजी म्हापसा येथील उत्पादन शुल्क विभागाने कायद्याचे उल्लंघन करून अँथनी डगामा यांचे 17 मे 2021 रोजी निधन झाले असतानाही त्यांच्या नावाने त्या परवान्यांचे नूतनीकरण महापालिकेने जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रानुसार केले गेले आहे.

अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी आज उत्पादन शुल्क आयुक्त नारायण गड यांची भेट घेत स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांनी उत्पादन शुल्क अधिकारी आणि आसगाव पंचायत यांच्या संगनमताने केलेल्या या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com