इराणींनी संसदेत 'तो' फोटो दाखवाला अन् वड्रांनी गोव्यातील रेस्टॉरंटचा विषय काढला; स्मृती, रॉबर्ट आमने-सामने

वड्रा यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीच्या गोव्यातील रेस्टॉरंटमधील वादग्रस्त बातम्यांचे फोटो शेअर केले आहेत.
Smriti Irani
Smriti IraniDainik Gomantak

Smriti Irani Robert Vadra Verbal War: केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार स्मृती इराणी यांनी रॉबर्ट वाड्रा यांचा गौतम अदानी यांच्या सोबतचा फोटो गुरूवारी संसदेत भाषण करताना दाखवला. त्यानंतर आता रॉबर्ट वड्रा यांनी शुक्रवारी एक फेसबुक पोस्ट प्रसिद्ध करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली.

वड्रा यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीच्या गोव्यातील रेस्टॉरंटमधील वादग्रस्त बातम्यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, वड्रा यांनी इराणींना त्यांच्या शैक्षणिक तपशीलांची माहिती द्यावी असे आवाहनही केले आहे.

देशाला इराणींच्या रेस्टॉरंट्स आणि डिग्रीबद्दल जाणून घ्यायचे आहे. असे वड्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, संसदेत त्यांच्या नावाचा 'दुरुपयोग' करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

देशाला तुमच्या गोव्यातील रेस्टॉरंट्सबद्दल आणि देशाच्या विविध भागांतील तृतीय हिस्स्यातील नावे जाणून घ्यायची आहेत. तसेच, तुमच्या पदव्या/शैक्षणिक पात्रता आणि त्याचा वाद जाणून घ्यायचा आहे.

तुम्ही आधी या गोष्टींबद्दल खुलासा करा आणि मग इतरांकडे बोट दाखवा.. गोव्यातील रेस्टॉरंट्सबद्दल आणि इतर बाबींचे उत्तर द्याल की नाही याची वाट पाहतोय आहे. तुम्ही खरोखर पात्र आहात की नाही याबद्दल मला शंका आहे. तुमच्याकडे कोणताही खुलासा किंवा प्रत्युत्तर नाही याचा अर्थ तुम्ही तथ्य लपवत आहात... लाज वाटायला पाहिजे!! असे रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Smriti Irani Robert Vadra Verbal War
Smriti Irani Robert Vadra Verbal WarFacebook Post
Smriti Irani
कोरोना काळात तूर डाळ खरेदीत 1.91 कोटींचा अनावश्यक खर्च; CAG अहवालातून गोवा सरकार ताशेरे

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार स्मृती इराणी यांनी रॉबर्ट वाड्रा यांचा गौतम अदानीसोबतचा फोटो गुरूवारी संसदेत भाषण करताना दाखवला.

'1993 मध्ये काँग्रेसने अदानींना मुंद्रा बंदरात जागा दिली... यूपीए सरकारच्या काळात त्यांनी अदानींना जागा दिली. अदानी यांना 72,000 कोटी रुपयांचे कर्ज. काँग्रेसच्या राजवटीत वेगवेगळ्या राज्यातील बंदरांचे काम अदानी कंपनीला का दिले गेले?' असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com