Saptakoteshwar Temple Goa: नार्वेच्या सप्तकोटीश्वर मंदिराच्या स्लॅबची ‘गळती’ थांबणार कधी?

पुरातत्व खात्याच्या आदेशानंतर डागडुजीचे काम सुरू
Saptakoteshwat Temple Leakage:
Saptakoteshwat Temple Leakage:Dainik Gomantak
Published on
Updated on

नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या स्लॅबला लागलेल्या ‘गळती’चा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असली, तरी गळती कायमची बंद करण्याचे कंत्राटदार कंपनीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम अखेर हातात घेण्यात आले आहे. सध्या काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली असली, तरी मंदिरातील समस्या कायमस्वरूपी सुटलेली नाही.

Saptakoteshwat Temple Leakage:
Goa Ganesha Festival: बाप्पालाही यंदा महागाईची झळ

सहा महिन्यांपूर्वी झाले होते काम

पुरातत्व खात्यातर्फे सुमारे सात कोटी रुपये खर्च करून सहा महिन्यांपूर्वी शिवकालीन इतिहास आणि गोमंतकीयांचे राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे नूतनीकरण करून मंदिराला नवा साज दिला आहे.

गेल्या ११ फेब्रुवारी रोजी या कामाचे लोकार्पणही करण्यात आले आहे. नूतनीकरण केल्यानंतर पहिल्या पावसाळ्यातच मंदिराच्या गर्भकुडीवरील घुमटीतून पावसाच्या पाण्याची ‘गळती’ सुरू झाली. लाद्या बसवूनही जमिनीखालून पाणी झिरपत असल्याचे आढळून आले.

Saptakoteshwat Temple Leakage:
Margao Garbage News: मडगावातून सोनसोडोत कचरा वाहतुकीचा महिन्याचा खर्च लाखांवर...

महिन्याभरापूर्वी मंत्र्यांकडून दिले गेले होते निर्देश

जवळपास महिन्याभरापूर्वी पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सप्तकोटीश्वर मंदिराच्या कामाची पाहणी करुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच सल्लागार, कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर धरले होते.

मंदिरातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले होते. त्यांच्या आदेशानंतर कंत्राटदाराने डागडुजीचे काम हाती घेतले.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराला भक्तगणांसह पर्यटकही भेट देतात. शिवकालीन इतिहासाला उजाळा देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. या मंदिराच्या स्लॅबला लागलेली ‘गळती’ वेळीच बंद करणे अत्यावश्यक आहे. अन्य समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे."

- तुकाराम गावडे, स्थानिक पंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com