Margao Garbage News: मडगावातून सोनसोडोत कचरा वाहतुकीचा महिन्याचा खर्च लाखांवर...

मडगाव पालिकेच्या निदर्शनास आणुनही दुलर्क्ष करत करत असल्याचा आरोप
Margao To Sonsodo Garbage Transport:
Margao To Sonsodo Garbage Transport: Dainik Gomantak

Margao To Sonsodo Garbage Transport: गोव्यातील मडगावातून कचरा प्रक्रियेसाठी सोनसोडो येथे नेला जातो. ट्रकमधून कचऱ्याची वाहतूक केली जाते आणि यासाठी महिन्याला एक कोटींहून अधिक खर्च येत असल्याची माहिती आहे.

ही बाब मडगाव पालिकेच्या निदर्शनास आणून देखील त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप मडगाव पालिकेच्या शॅडो कौन्सिलचे संयोजक सॅव्हियो कुतिन्हो यांनी केला आहे.

Margao To Sonsodo Garbage Transport:
सुखी संसाराचे स्वप्न भंगले; बाणस्तारी मर्सडीज अपघातातील जखमी वनिता 8 महिने अंथरूणाला खिळून राहणार, आईला सोडावी लागली नोकरी

कुतिन्हो म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. आम्ही वारंवार भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आणले आहेत. आता पुन्हा एक प्रकार निदर्शनास आणला आहे.

मडगावातून सोनसोडोत कचरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर मडगाव पालिका दिवसाला 11 हजार 800 रूपये खर्च करते. दिवसभरात तीन फेऱ्या होतात. म्हणजेच दिवसाला हा खर्च 35 हजार 400 रूपये होतो. इतके पैसे पालिकेला द्यावे लागतात.

हा संपूर्ण खर्च महिन्याकाठी 10 लाखांच्याही पुढे जातो. कचरा मडगाव ते साळगाव येथे कचरा वाहतूक करायला हा इतका खर्च येतो. आम्ही हे सर्व पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणला आहे. पण तरीही काहीही त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही कुतिन्हो यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com