Goa Crime: शाळांमध्ये चोरी, मालमत्तेची नासधूस व जाळपोळ केल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक; चोरलेला मुद्देमाल जप्त

Anjuna Police: १८ ते २० वयोगटातील मुलांची टोळी; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही संशयितांमध्ये समावेश असून त्याचा शोध सुरु
Anjuna Police: १८ ते २० वयोगटातील मुलांची टोळी;  १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही संशयितांमध्ये समावेश असून त्याचा शोध सुरु
Anjuna PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : हडफडे आणि धुळेर-म्हापसा येथील दोन शाळांमध्ये चोरी तसेच मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस व जाळपोळ केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी सहा जणांच्या १८ ते २० वयोगटातील मुलांच्या टोळीला अखेर अटक केली. या संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाळा सोडल्याचा दाखला देण्यास उशिर केल्याच्या राग मनात बाळगून आधी हडफडे येथील सेंट जोजफ हायस्कूलमधील २.५ लाख रुपयांच्या मौल्यवाहन वस्तूंची चोरी तर केवळ मौजमस्ती म्हणून धुळेर-म्हापसा येथील सेंट अँथनी हायस्कूलच्या मालमत्तेची नासधूस या टवाळखोरांनी केली होती. या संशयितांपैकी पाजजण हे सेंट जोजफ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी आहेत.

अटक केलेल्यांत किरण अर्जुन महाराणा (१८, रा. पर्रा), रोनित राजेश रेडकर (१८, रा. थिवी), वैभव वसंत जाधव (१८, रा. म्हापसा), ऑल्विन तिओतोनिक फर्नांडिस (१८, रा. हडफडे), कैफ मेहबूब अली बडिगर (१८, रा. पर्रा) व कबीर महावीर प्रधान (२०, रा. बागा-हडफडे) या संशयितांचा समावेश आहे. तर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही संशयितांमध्ये समावेश असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सेंट जोजफ हायस्कूलमध्ये दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी, संध्याकाळी ४.३० ते ते दि. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली होती. अज्ञात संशयितांनी शाळेच्या फाटकावरून उडी टाकून शाळेत प्रवेश केला व नंतर मुख्याध्यापकांच्या कॅबीन, ऑफिस व स्टाफ रूमच्या खोलीची कुलूपे तोडली. या तिन्ही खोल्यातील दोन संगणक मॉनिटर, इन्व्हर्टर, डिव्हीआर, सीपीयू, यूपीएस मिळून २.५ लाख रुपयांच्या वस्तू चोरल्या होत्या.

याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार हणजूण पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३०५, ३३१(३), ३३१(४) व ३(५) कलमांन्वये गुन्हा नोंद केला होता.

चौकशीनंतर पोलिसांनी वरील संशयितांना सोमवारी २६ रोजी पकडून अटक केली. तसेच संशयितांकडून वरील चोरीतील डिव्हीआर वगळता अन्य सर्व वस्तू हस्तगत केल्या.

दरम्यान, हणजूण पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी धुळेर म्हापशातील सेंट अँथनी विद्यालयात देखील आम्हीच चोरी तसेच नासधूस केल्याची जबानी दिली.

या शाळेतील चोरीची घटना, ९ रोजी उघडकीस आलेली. संशयितांनी मुख्याध्यापक,व्यवस्थापकांचे केबिन व स्टाफ रूममधील साहित्य चोरले होेते.

Anjuna Police: १८ ते २० वयोगटातील मुलांची टोळी;  १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही संशयितांमध्ये समावेश असून त्याचा शोध सुरु
Mapusa Garbage Issue: म्हापसा पालिकेचा साफसफाई कामांवर भर; चतुर्थीआधी म्हापसा होणार चकाचक

धास्ती निर्माण करण्यासाठी पूर्वनियोजन...

संशयित किरण याला शाळा सोडल्यानंतर, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता. यासाठी त्याने मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्याला लेखी अर्ज लिहून दे व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायला सांगितल्या. आपल्याच शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्लक दाखल्यासाठी मुख्याध्यापक तथा व्यवस्थापनाकडून त्रास दिला जात असल्याचा कथित राग किरण याच्या डोक्यात होता. हा दाखला मिळताच, त्याने हा प्रकार आपल्या सहाध्यायी माजी विद्यार्थ्यांना कथन केला. त्यानंतर या गटाने पूर्वनियोजन करीत शाळेत चोरी केली. त्यानंतर फक्त मौजमस्ती व शाळा व्यवस्थापनात धास्ती निर्माण करण्यासाठी म्हापसा येथील सेंट अँथनी हायस्कूलच्या मालमत्तेची नासधूस करुन तिथे जाळपोळ केली, असे पोलिस चौकशीत संशयितांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com