Turtle Eggs At Morjim: २५ वर्षांतील विक्रम ; मोरजी किनारी २१४ कासवांनी घातली २२ हजारांपेक्षा जास्त अंडी

Turtle Eggs At Morjim: कासव संवर्धन मोहिमेंतर्गत २००० पेक्षा जास्त पिल्लांना सोडले समुद्रात
Turtle Eggs At Morjim
Turtle Eggs At MorjimDainik Gomantak

Morjim Turtle :

यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल २१४ कासवांनी तेंबवाडा किनारी भागात २२,००० पेक्षा जास्त अंडी घातली.

त्यातील २,००० पेक्षा जास्त पिल्ले समुद्रात सोडण्यास वन विभागाला यश आले आहे. २५ वर्षांच्या कालखंडानंतर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर कधीच एवढ्या फरकाने सागरी कासव किनारी भागात आले नव्हते.

मोरजी-तेमवाडा किनारी भागात १९९७ सालापासून दुर्मिळ ऑलिव्ह रिडले सागरी कासव संवर्धन मोहीम सुरवातीला वन विभागामार्फत आतापर्यंत राबवली आहे.

आतापर्यंतच्या २५ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीच १०० चा आकडा कासवांनी पार केला नव्हता; परंतु २०२३-२०२४ या वर्षामध्ये डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते मार्चपर्यंत २१४ कासवांनी २२ हजारपेक्षा जास्त अंडी घालण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केल्याने ही सागरी कासव मोहीम दिवसेंदिवस यशस्वी ठरत आहे.

मात्र, जे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेऊन सागरी कासवांच्या अंड्यांना सुरक्षा देण्याचे काम करतात त्यांच्याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येते.

१५ ते २५ वर्षे सेवा करूनही काही कर्मचाऱ्यांना सरकारने अजूनपर्यंत सेवेत कायमस्वरूपी केले नाही. शिवाय त्यांना कसल्याप्रकारची बढतीही मिळत नाही. तरीही स्थानिक कामगार प्रामाणिकपणे कासव संवर्धन मोहीमअंतर्गत काम करत आहेत.

५२ दिवसांनी पिल्ले अंड्याबाहेर

ज्या ठिकाणी कासव येऊन अंडी घालतात त्या अंड्यांमधून निसर्गप्रक्रियेनुसार ५० ते ५२ दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात.

ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी त्या पिल्लांना पुन्हा नवीन भांड्यामध्ये पाणी घालून सुरक्षित ठेवतात आणि सायंकाळी सूर्य मावळतीकडे गेल्यानंतर त्यांना समुद्राच्या पाण्याचा मार्ग दाखवून सोडले जाते.

Turtle Eggs At Morjim
NSG Goa Blast Investigation: गोव्यातील स्फोटाचा एनएसजी तपास करणार, अधिकारी घटनास्थळी

२ कासवांची अंडी सुरक्षित जागेत

आतापर्यंत २१४ सागरी कासवांनी जी अंडी घातलेली होती ती अंडी सुरक्षित केलेल्या जागेमध्ये न घालता इतरत्र घालण्याचा प्रकार घडला. मात्र, मागच्या दोन दिवसांपूर्वी दोन कासवांनी थेट ज्या ठिकाणी आरक्षित केलेली जागा आणि सुरक्षित ठेवलेली अंडी आहेत त्या जागेमध्ये येऊन अंडी घालण्याचा प्रकार घडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com