Siolim Roads: शिवोलीतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला स्थानिक राजकारणीच जबाबदार

खड्ड्यातील पाण्यात कागदी होड्या सोडून राजकारण्यांचा निषेध केला. (Protest against Siolim Politician)
Protest for Deadly roads in Siolim, Goa, on Thursday, 22 July, 2021(Siolim Roads)
Protest for Deadly roads in Siolim, Goa, on Thursday, 22 July, 2021(Siolim Roads) Dainik Gomantak
Published on
Updated on

जगाच्या नकाशावर सदोदित प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या आपल्या राज्याला (Goa State) विशेष करून शिवोली मतदारसंघाला (Siolim Constituency) सध्या पुर्णपणे उध्वस्त आणी उखडलेल्या रस्त्यांचे (Deadly Roads in Siolim) ग्रहण लागलेले असुन यासाठी येथील स्थानिक राजकारणीच जबाबदार (Local Politician Responcible) असल्याचे परखड मत सामाजिक कार्यकर्ते तथा कॉगेसचे नेते (Congress Leader) दत्ताराम पेडणेकर यांनी आंसगावात व्यक्त केले. गेली पंचवीस वर्षे शिवोलकरांना हॉटमिक्सींग केलेल्या दर्जेदार रस्त्यांचे कधी स्वप्न सुद्धा पडले नसल्याची खोचक टीका पेडणेकर यांनी यावेळी केली. दरम्यान, शिवोलीतील रस्त्यांची झालेली चाळण (Bad Roads in Siolim) आणि दयनीय परिस्थिती लक्षात घेत शिवोली युथ कॉग्रेस (Siolim Youth Congress) तसेच शिवोली महिला गट समितीच्या वतीने सोनारखेड – आंसगांव (Sonarkhed - Asagaon) येथील मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे (PWD Negligence) जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यातील (Deadly Roads) पाण्यात प्रतिकात्मक कागदाच्या होड्या सोडून शिवोलीतील प्रस्थांपित राजकारण्यांचा निषेध करण्यात आला. (Protest against Local Politician)

Protest for Deadly roads in Siolim, Goa, on Thursday, 22 July, 2021(Siolim Roads)
Goa: बायणा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याची दुर्दशा

शिवोली युथ कॉगेसचे एडवोकेट रोशन चंद्रकांत चोडणकर, तसेच अध्यक्ष यश कोचरेकर यांनी शिवोलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून आपण कुठल्यातरी परग्रहावर असल्याचा भास होत असल्याचे सांगितले. यावेळी शिवोली कॉग्रेसचे माजी गटाध्यक्ष राजेश कोचरेकर, महिला गट अध्यक्षा पार्वती नागवेकर, समितीच्या सदस्यां उषा दत्ताराम पेडणेकर, सरीता खोबरें , मंगल नागवेंकर, कालींदी कोलवाळकर, शितल वालावलकर, आशा शिरोडकर, आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. शेवटी पार्वती नागवेंकर यांनी येत्या आठवडाभरात येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात न आल्यास स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने पुन्हां एकदां रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.(Siolim Roads)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com