Goa: बायणा येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याची दुर्दशा

बायणा (Baina) रवींद्र भवनासमोरील रस्त्यावरून सतत वर्दळ असते. येथे उड्डाण पुल बांधताना एक खांब रस्त्यावर बांधण्यात आल्याने रस्ता दोन भागात दुभागला गेला आहे.
बायणा (Baina) येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याची दुर्दशा व एका बाजूने ये-जा करणारी वाहने.
बायणा (Baina) येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याची दुर्दशा व एका बाजूने ये-जा करणारी वाहने.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: बायणा (Baina) रवींद्र भवनासमोरील उड्डाण पुलाखालील (Fly Over) रस्त्याची दुर्दशा झाल्याने शहर भागातून बायणाकडे येणारा रस्ता वाहतुकीला पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालक चुकीच्या मार्गाने वाहतूक करीत आहेत. संबंधित तेथील रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी अपघाताची वाट पाहत आहेत काय असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. (Road under the flyover at Baina was damaged)

बायणा रवींद्र भवनासमोरील रस्त्यावरून सतत वर्दळ असते. येथे उड्डाण पुल बांधताना एक खांब रस्त्यावर बांधण्यात आल्याने रस्ता दोन भागात दुभागला गेला आहे.एका बाजूने शहर भागातून बायणाकडे येणारी वाहने तर दुसरया बाजूने बायणातून शहराकडे जाणारी वाहने जातात. परंतू दोन महिन्यापूर्वी एका बाजूला खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे तेथील वाहतूक चुकीच्या दिशेने करण्यात येऊ लागली होती.

शहराकडून येणारी व शहराकडे जाणारी वाहने एकाच रस्त्यावरून जाऊ लागली होती. सुमारे एक महिन्यानंतर खोदकाम बुजविण्यात आले. मात्र तेथे त्या ठिकाणी पावसामुळे भला मोठा खड्डा तयार झाल्याने वाहनचालकांनी त्या रस्त्याचा वापर बंद केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंची वाहने एकाच रस्त्यावरून ये-जा करू लागली आहेत. यामुळे तेथे मोठा अपघात घडण्याची भीती आहे.

बायणा (Baina) येथील उड्डाण पुलाखालील रस्त्याची दुर्दशा व एका बाजूने ये-जा करणारी वाहने.
Goa: पेडणेतील दुसऱ्याही पोर्तुगीज काळातील पूलाला धोका कायम

सदर रस्त्याची दुरुस्ती गरज आहे. परंतू दुरुस्ती कोणी करावी हा प्रश्न आहे. यापूर्वी तेथे उड्डाण पुल बांधणारया कंत्राटदाराने सिमेंट काँक्रिट घालून खड्डे बुजविले होते. मात्र यावेळेस तशी कृती झाली नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम त्या कंत्राटदाराचे कि सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे या घोळ सुरु असावा. या घोळामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो याची जाण कोणीतरी ठेवण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com