Siolim News : शिवोलीत जलस्रोतमंत्र्यांकडून पडिक शेतजमिनीची पाहणी

Siolim News : यावेळी त्यांच्यासोबत शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, सडयेच्या सरपंच दीपा पेडणेकर, उपसरपंच नीलेश वायंगणकर, पंचसदस्य सचिन मांद्रेकर, निशांत कळंगुटकर तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌
siolim Agriculture
siolim AgricultureDainik Gomantak

Siolim News : शिवोली, राज्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी शुक्रवारी (ता.२२) सकाळी सडये-शिवोली जोडरस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पडिक शेतजमिनीची पाहणी केली.

गेली कित्येक वर्षे पडिक बनून राहिलेली येथील जमीन शेतीच्या कामासाठी योग्य आणि सुपीक बनविण्यासाठी येत्या मंगळवार, २६ रोजीपासून खात्यातर्फे काम हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन शिरोडकर यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांच्यासोबत शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, सडयेच्या सरपंच दीपा पेडणेकर, उपसरपंच नीलेश वायंगणकर, पंचसदस्य सचिन मांद्रेकर, निशांत कळंगुटकर तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

siolim Agriculture
Goa Live Updates 23 December: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी...

तिळारी कालव्याचे पाणी शापोरा नदीच्या पात्रातून वाहत येथील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात साचत असल्याने दलदल निर्माण होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे मुश्किलीचे होत असल्याची माहिती मंत्री शिरोडकर यांना देण्यात आली.

यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले. दरम्यान, येथील पाहणीनंतर मंत्री शिरोडकर यांनी आमदार दिलायला लोबो यांच्यासोबत शेळ-शिवोली येथील शेतजमीन तसेच तेथील परिस्थितीची पाहणी केली.

लवकरच उपाययोजना करणार

गेली २० ते २५ वर्षे येथील परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून लवकरात लवकर या समस्येवर उपाय काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

मंत्री शिरोडकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच उपाय योजण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. तसेच जमीन लवकरात लवकर भातशेती पिकवण्याच्या योग्यतेची करणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com