गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी माणिकराव ठाकरेंची नियुक्ती झाल्याची महत्वाची बातमी समोर येतेय.
गेल्या 24 तासांत गोव्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 222 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत. देशासह विविध राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल गोव्यातील जनतेचे अभिनंदन! या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. त्यामुळे आगामी काळात पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोव्यातून अवैध पद्धतीने मद्य वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्क पथकाने शुक्रवारी बेळगाव येथे पकडला. पथकाने 25 लाख किमतीचे 600 मद्याचे बॉक्स जप्त केले आहेत.
मशरूमच्या बिया वाहतूक करत असल्याचे सांगून अवैध पद्धतीने मद्य वाहतूक केली जात होती.
पर्रा येथे आयोजित फेस्टिवल ऑफ लाईट्स कार्यक्रमात म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो व इतर
फोंडा वरचा बाजार येथील बंद पडक्या घरात एका मजुराचा मृतदेह सापडला आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाबोळी विमानतळ वाहतूक कक्षाने 11,326 जणांवर गुन्हा दाखल करून 60 लाख दंड वसूल केला. तसेच 95 परवाने निलंबनासाठी पाठवले असून खाजगी गाड्या भाड्याने दिल्याबद्दल 4 खाजगी कारवर गुन्हा नोंद केला. पीआय राहुल दामशेकर यांची माहिती
ख्रिसमस आणि सनबर्न फेस्टिव्हलमुळे उद्भविणाऱ्या वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज आहेत. दोन्ही गोष्टींचा विचार करून राज्यभरात 800 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 1 जानेवारीपर्यंत विशेष ट्रॅफिक मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
कुंभार वाड्यात चांदेल येथे बिबट्याचा वासरावर हल्ला. सुदैवाने त्याच दरम्यान घरातील मंडळींना जाग आली. ते उठल्यानंतर आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र वासराच्या गळ्याजवळ मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने गावातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित बिबट्याला वनखात्याने पिंजरा लावून लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
मागील महिन्यात म्हणजे 11 नोव्हेंबरला वागतोर येथे चारचाकीच्या धडकेत स्थानिक महिला रेमेडियाना उर्फ रोमी आल्बुकेर्क (56) यांचा दुर्दैवी अंत झाला. यामधील आरोपी चालक सचिन कुरूप याला हायकोर्टातर्फे जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात येणारा पर्यटकांचा लोंढा वाढत आहे. रस्त्यावर जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. राज्याच्या मुख्य शहरात म्हणजेच पणजीमध्ये दिवसेंदिवस ही समस्या वाढत आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख पसंती ही किनारी भागाला असते. मात्र मागील काही वर्षात पणजीतही पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.50
Panjim ₹ 97.50
South Goa ₹ 97.56
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.06
Panjim ₹ 90.06
South Goa ₹ 90.11
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.